बॉलिवूडमधील काळ खूप बदलला आहे. आज अभिनेत्री आणि अभिनेता इंटिमेट सीन द्यायला तयार असतात. नुकताच येऊन गेलेला सिनेमा रॉकी और रानी की प्रेम कहाणीमध्ये वयाच्या 72 व्या वर्षी शबाना यांनी धर्मेंद्रसोबत किसिंग सीन दिला होता. त्यानंतर सिनेसृष्टीत एकच चर्चा होती. पण एक काळ असा होता जेव्हा इंटिमेट सीनच्या नावाने शबाना यांनी रडू कोसळलं होतं.
शशि कपूर ओरडला अन् मग...
पाच वेळा राष्ट्रीय पुरस्कार पटकावणारी शबाना आझमी यांनी त्यांच्या आयुष्यातील शशी कपूरसोबतच्या त्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्या म्हणाल्या की, वयाच्या 9 वर्षांपासून त्या शशी कपूरच्या फॅन होत्या. त्या शशी कपूरच्या इतक्या चाहत्या होत्या की, त्यांच्या फोटोसाठी त्या आपल्या पॉकेटमनी खर्च करायच्या. पुढे जाऊन शबाना यांना शशी कपूरसोबत काम करण्याची संधी मिळाली. पण त्यांच्या असभ्य वर्तनाने त्या दु:खी झाल्या होत्या.
झूमला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी शशी कपूर यांच्यासोबत काम करतानाच्या आठवणी ताज्या केल्यात. त्या म्हणाल्यात की, 'दर रविवारी शशी कपूर कुटुंबासोबत आमच्या शेजारी राहणाऱ्या त्यांचे वडील पृथ्वीराज कपूर यांच्या भेटीला यायचे. मी त्यांचे ब्लॅक अँड व्हाइट फोटो विकत घ्यायची आणि दर रविवारी त्यांचा ऑटोग्रफ घ्यायला जायची.'
'एकेदिवशी हीरा और पत्थर या चित्रपटात मला शशी यांच्या विरोधात कास्ट केलं मला विश्वासच बसला नाही. त्यानंतर 1976 मधील फकीरा या चित्रपटातील दिल में मुझे बिठाकर या गाण्याच्या वेळी मी शशी येण्याच्या पहिले सेटवर पोहोचली. तेव्हा सत्यनारायणजी कोरियोग्राफी करत होते. तेव्हा मी पाहिलं की, स्टेप्स खूप जास्त इंटिमेट आहे. मी शशी कपूरपेक्षा खूप लहान होती. ते पाहून माझ्या डोळ्यात पाणी आलं. मी सेट सोडून मेकअप रुममध्ये निघून गेली.'
'त्यानंतर माझ्या हेअरड्रेसरजवळ बसून रड होती तेव्हा अचानक दरवाज्यावर जोरदार नॉक झालं. मी पाहिलं तर ते शशी कपूर होते. ते आले आणि म्हणाले, काय प्रॉब्लेम आहे तुला? तेव्हा शबाना आझमीने त्यांना सांगितलं की मी तुमच्यासोबत इंटिमेट सीन नाही करु शकतं. त्यावेळी शशी कपूर म्हणाले, तू जेव्हा अभिनेत्री बनलीस आणि म्हणालीस, मम्मी, मम्मी, मी देखील अभिनेत्री बनणार आहे...तेव्हा तुला हे करावं लागेल असं तुझ्या मनात आले नाही का? मुर्ख मुलगी...असं रागवून शशी कपूर निघून गेले.'
'त्यांच्या या अभ्यस वर्तनाने मला धक्का बसला. ममी हेअर ड्रेसरकडे पाहिलं आणि म्हटलं तो खूप बेकार आहे, तो माझ्याशी कसा वागला बघितलं ना? त्यानंतर मी अर्धा तासानंतर सेटवर गेल्यावर पाहिलं तर त्यांनी सर्व स्टेप्स बदलेले होते, तो असा माणूस होता. त्याच्या रागामध्येही प्रेम आणि काळजी होती. तो एक क्रेजी माणूस आहे.'
'जेव्हा शबाना आझमी झोपडपट्टीवासीयांच्या समर्थनार्थ उपोषणाला बसल्या होत्या तेव्हा शशी कपूर भेटायला आले होते. त्यानंतर त्यांच्या मागण्या घेऊन ते तत्कालीन मुख्यमंत्री एस. बी. चव्हाण यांच्याकडे गेले होते. 'फिल्म इंडस्ट्री तुमच्यासाठी खूप काही करते आणि आमच्या इंडस्ट्रीतील एक प्रमुख व्यक्ती उपोषणाला बसली आहे, तुम्हाला काहीतरी करावं लागेल.' पाच दिवस सुरू असलेले हे उपोषण शशी यांच्यामुळेच सुटलं. पण त्यांनी या उपोषणाचं श्रेय कधी घेतलं नाही.'
दरम्यान शशी कपूर आणि शबाना आझमी यांनी 'हीरा और पत्थर' (1977), चोर सिपाही (1977), 'अतिथी' (1978) आणि 'ऊंच नीच' (1989) यांसारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं. दीर्घकाळ आजारपणामध्ये 4 डिसेंबर 2017 रोजी शशी कपूर यांचं निधन झालं.