'माझ्या प्रसिद्धीमुळेच माझ्या मुलांवर वाईट वेळ येईल' शाहरुखचं हे वक्तव्य पुन्हा चर्चेत

बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान नुकताच त्याचा मुलगा आर्यन खानला भेटण्यासाठी मुंबईतील आर्थर जेलमध्ये पोहोचला होता.

Updated: Oct 23, 2021, 04:36 PM IST
'माझ्या प्रसिद्धीमुळेच माझ्या मुलांवर वाईट वेळ येईल' शाहरुखचं हे वक्तव्य पुन्हा चर्चेत

मुंबई : बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान नुकताच त्याचा मुलगा आर्यन खानला भेटण्यासाठी मुंबईतील आर्थर जेलमध्ये पोहोचला होता. त्याचे तेथील फोटो आणि व्हिडिओ इंटरनेटवर प्रचंड व्हायरल झाले. शाहरुखचा मुलगा आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली आहे. आर्यन खानला एनसीबीने २ ऑक्टोबरला रेव्ह पार्टीतून अटक केलं होतं.

माझं नाव मुलांचं आयुष्य खराब करू शकतं
आर्यन खान प्रकरणादरम्यान, सुपरस्टार शाहरुख खानचा एक जुना व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये, शाहरुख खानने त्याला वाटण्याऱ्या भिती बद्दल सांगितलं आहे. या व्हिडिओमध्ये शाहरुख खान म्हणाला, 'माझं नाव माझ्या मुलांचं आयुष्य खराब करू शकतं आणि मला असं होऊ नये असं वाटतं.'

शाहरुखच्या लोकप्रियतेचे दुष्परिणाम
एका अहवालानुसार, 2008 मध्ये, एका जर्मन टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत शाहरुख खान त्याच्या लोकप्रियतेबद्दल आणि त्याच्या मुलांवर होणाऱ्या दुष्परिणामांबद्दल बोलताना दिसला. यावेळी शाहरुख खान म्हणाला, 'माझ्या कुटुंबाबद्दल, विशेषत: माझ्या मुलांबद्दल माझी सगळ्यात मोठी भीती म्हणजे ते माझ्या सावलीशिवाय जगू शकतील.'

माझ्या मुलांना काही करण्याची गरज नाही?
शाहरुख खान पुढे म्हणाला, 'माझी सगळ्यात मोठी भीती माझ्या प्रसिद्धीचा त्यांच्यावर होणारा परिणाम आहे. मला नाही वाटत की, मी ते कधी भांडण करतील आणि म्हणतील ओह मी माझ्या वडिलांपेक्षा ग्रेट आहे. मला हे देखील नकोय की, माझ्या फेमद्वारे त्यांना असं वाटलं नाही पाहिजे की, त्यांना काहीही करण्याची गरज नाही कारण ती माझी मुलं आहेत.