Dunki Film Idea : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा 'डंकी' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाला घेऊन प्रेक्षक इतके आतुर आहेत की याविषयी छोट्या छोट्या गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. पण तुम्हाला माहित आहे का की 'डंकी' बनवण्यासाठी राजकुमार हिरानी यांना आयड्या कुठून आली. चला जाणून घेऊया सगळं काही...
राजकुमार हिरानी सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहेत. त्याचं कारण त्यांचा डंकी हा चित्रपट आहे. खरंतर जेव्हा राजकुमार हिरानी शाहरुखसोबत चित्रपट करणार हे कळलं तेव्हा प्रेक्षकांना सगळ्यांची उत्सुकता वाढली होती. त्यातही प्रेक्षकांमध्ये देखील दोन गट पडले आहेत. काही चाहते आहेत जे शाहरुखसाठी हा चित्रपट पाहण्यासाठी जात आहेत. तर काही चाहते आहेत जे राजकुमार हिरानी यांचा चित्रपट आहे म्हणून थिएटरमध्ये जात आहेत.
राजकुमार हिरानी यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत या चित्रपटाची पटकथा कशी सुचली याविषयी सांगितलं आहे. 'पंजाबच्या जलंधरमध्ये त्यांनी एक घर पाहिलं होतं. त्या घराच्या छतावर हॅलीकॉप्टर काढण्यात आलं होतं. जेव्हा मी या संबंधीत माहिती काढली तेव्हा समजलं की ज्या घरातील लोक परदेशात काम करतात त्यांच्या कुटुंबाकडे लोक आदारानं पाहतात. सुरुवातीला मला हे सगळं खूप मजेशीर वाटलं. जेव्हा याचा अभ्यास केला तेव्हा मला कळलं की पंजाबच्या जलंधर जवळ असलेल्या तल्खन असं एक गावं आहे. या गावात परदेशात जाण्यासाठी लोकं वेडे आहेत. या गावातील लोक परदेशात जाण्यासाठी इंग्रजी शिकतात आणि या सगळ्या गोष्टीचा खूप चांगल्या पद्धतीनं विचार करतात. येथे शहीद बाबा निहाल सिंह नावाची एक गुरुद्वारा सुद्धा आहे, ज्याला वीजा गुरुद्वारा असे देखील म्हणतात.'
शहीद बाबा निहाल सिंहविषयी बोलताना राजकुमार हिरानी म्हणाले की 'येथे लोक येतात आणि छोटे छोटे प्लेन चढवतात. असं म्हटलं जातं की लोकांचा विश्वास आहे की असं केल्यानं त्याला लवकरात लवकर वीजा मिळेल.'
हेही वाचा : Dunki पाहिल्यावर गौरी आणि अबरामला कसा वाटला? शाहरुखनंच सांगितलं
दरम्यान, शाहरुखच्या 'डंकी'सोबत आज दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासचा 'सालार' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या दोन्ही चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर आता हे दोन्ही चित्रपट किती कमाई करतील याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.