Shah Rukh Khan ने सांगितलं सिल्की आणि दाट केसांमागचं गुपित, किचनमधील 3 पदार्थ न चुकता वापरतो

Shah Rukh Khan Hair : शाहरुख खानचा चित्रपट 'डंकी' 21 डिसेंबर 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात शाहरुख खानशिवाय तापसी पन्नू, विकी कौशल आणि बोमन इराणी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Nov 27, 2023, 01:13 PM IST
Shah Rukh Khan ने सांगितलं सिल्की आणि दाट केसांमागचं गुपित, किचनमधील 3 पदार्थ न चुकता वापरतो title=

Shah Rukh Khan : या वर्षी 2023 मध्ये  'पठाण' आणि 'जवान' यांसारख्या चित्रपटांनी धुमाकूळ घातल्यानंतर शाहरुख खान लवकरच 'डंकी' चित्रपटात दिसणार आहे. पुढील महिन्यात हा चित्रपट चित्रपटगृहात दाखल होणार आहे. 'डंकी' चित्रपटाचे दिग्दर्शन राजकुमार हिरानी यांनी केले असून शाहरुख खानसोबतचा हा त्याचा पहिला प्रोजेक्ट आहे. प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. आज या चित्रपटातील 'लट पुट गया' हे गाणे रिलीज झाले आहे. दरम्यान, शाहरुखने X वर चाहत्यांसोबत 'SRK आस्क' आयोजित केले, जिथे त्याने युझर्सच्या अनेक प्रश्नांची उत्तरे दिली.

युझरने विचारला केसांवर प्रश्न 

'डंकी' चित्रपटाचे पहिले गाणे रिलीज झाल्यानंतर शाहरुख खानने सोशल मीडियावर चाहत्यांशी प्रश्नांचे सेशन आयोजित केले. यादरम्यान एका युझरने शाहरुख खानला त्याच्या केसांबाबत प्रश्न विचारला, ज्याला किंग खानने अतिशय मजेशीर उत्तर दिले. युझरने विचारले, 'तुमच्या बाऊन्सी आणि दाट केसांचे रहस्य काय आहे?' चाहत्याला उत्तर देताना शाहरुख खानने लिहिले, 'मी आवळा, भृंगराज आणि मेथी लावतो!!!'

शाहरुखची पोस्ट

तुम्हालाही तुमचे केस शाहरुख सारखे बाऊन्सी आणि दाट केसांसाठी आवळा, मेथी आणि भृंगराज तेलाचा वापर करु शकता. जाणून घ्या त्याचे फायदे 

आवळा, मेथी, भृंगराज तेल लावण्याचे फायदे 

1. केस गळणे टाळण्यास मदत होईल
2. हे केसांचे मूळ मजबूत करेल आणि वाढीस मदत करेल
3. डोक्यातील कोंडा, बुरशी आणि टाळूची घाण साफ करण्यासाठी एक प्रभावी उपाय
4. केस जाड आणि चमकदार होण्यास मदत होते
5. हे केस नैसर्गिकरित्या काळे ठेवण्यासाठी उपयुक्त आहे आणि पांढरे होण्यापासून बचाव करण्यासाठी देखील उपयुक्त आहे.

या मिश्रणाचे तेल बनवण्याचे साहित्य-कृती

आवळा पावडर- 1 टीस्पून
रीठा पावडर - 1 टीस्पून
शिककाई पावडर- 1 टीस्पून
हिबिस्कस पावडर - 1 टीस्पून
भृंगराज पावडर- 1 टीस्पून
केसांचे तेल (मोहरी किंवा नारळ) - 2-3 चमचे

वापरण्याची पद्धत:

एका भांड्यात सर्व साहित्य एकत्र घ्या. त्यात तेल घालून मिक्स करा. आता आवश्यकतेनुसार पाणी घालून गुळगुळीत पेस्ट बनवा. हेअर पॅक म्हणून वापरा. आंघोळीच्या 1 तास किंवा 30 मिनिटे आधी केसांना लावा आणि नंतर आपले डोके धुवा. हे नैसर्गिक शैम्पू म्हणून काम करेल आणि खोल साफ करण्यास मदत करेल.