Drugs Case : आर्यन खान NCB समोर हजर झाला नाही, जाणून घ्या काय होते कारण

आर्यन खान NCB च्या चौकशीला गैरहजर 

Updated: Nov 8, 2021, 07:26 AM IST
Drugs Case : आर्यन खान NCB समोर हजर झाला नाही, जाणून घ्या काय होते कारण title=

मुंबई : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) रविवारी बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला चौकशीसाठी बोलावले. मात्र स्टारकिडच्या मॅनेजरने सांगितले आहे की, तो एनसीबीसमोर हजर राहू शकणार नाही. प्रकृती अस्वास्थ्यामुळे तो चौकशीसाठी उपलब्ध होणार नसल्याचे एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

प्रकृती अस्वास्थामुळे आर्यन गैरहजर 

मिळालेल्या माहितीनुसार, आर्यन खानला कमी ताप आहे. त्यामुळे तो एनसीबीमध्ये हजर राहू शकला नाही. रविवारी संध्याकाळी 6 वाजल्यापासून एनसीबी ड्रग्ज प्रकरणी आर्यन खानची चौकशी करणार होते. ड्रग्ज प्रकरणी अरबाज मर्चंट आणि अचित कुमार यांची आज चौकशी करण्यात आली. आर्यन खान सध्या जामिनावर बाहेर आहे.

जामीनावर आर्यन खान बाहेर 

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये 26 दिवस कारागृहात होता. यानंतर शाहरुख खानच्या कायदेशीर टीमच्या प्रयत्नांना यश आले आणि आर्यनची हायकोर्टाने जामिनावर सुटका केली. एनसीबीने आर्यन खानवर ड्रग्ज घेणे आणि त्याचा पाठलाग करणे असे सर्व गंभीर आरोप केले आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Aryan Khan 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आता पुढच्या वेळी त्याला ९ नोव्हेंबरला चौकशीसाठी बोलावले जाऊ शकते. आर्यन खानला त्याच्या मित्रांसह रेव्ह पार्टीतून अटक करण्यात आली होती. सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान बॉलिवूडमध्ये कधी पदार्पण करणार या प्रश्नाचे उत्तर प्रत्येकाला जाणून घ्यायचे होते, पण त्याच दरम्यान त्याला या खळबळजनक प्रकरणात अटक करण्यात आली.