आर्यन खानची सुटका होईपर्यंत 'मन्नत' मध्ये बनवली जाणार नाही मिठाई, गौरी खानने कर्मचाऱ्यांना दिले आदेश

शाहरुख खान आणि गौरी खान आपला मुलगा आर्यन खानच्या तुरुंगातून सुटकेची वाट पाहत आहेत.

Updated: Oct 19, 2021, 08:30 PM IST
आर्यन खानची सुटका होईपर्यंत 'मन्नत' मध्ये बनवली जाणार नाही मिठाई, गौरी खानने कर्मचाऱ्यांना दिले आदेश

मुंबई : शाहरुख खान आणि गौरी खान आपला मुलगा आर्यन खानच्या तुरुंगातून सुटकेची वाट पाहत आहेत. ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानच्या अटकेने सर्वांना आश्चर्यचकित केलं आहे. दरम्यान, अशी बातमी समोर येत आहे की, गौरी खान आणि तिचं संपूर्ण कुटुंब कोणताही सण साजरा करण्याच्या मूडमध्ये नाहीत. एवढंच नाही तर, असंही म्हटलं जात आहे की, गौरी खानने सगळ्या कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या आहेत की, जोपर्यंत आर्यन खान घरी परतत नाही तोपर्यंत मन्नतमध्ये मिठाई बनवली जाणार नाही.

एका वृत्तानुसार, गौरीने मन्नतच्या सगळ्या कर्मचाऱ्यांना आदेश दिला आहे की, आर्यन खान परत येईपर्यंत घरात मिठाई बनवली जाणार नाही. अहवालात असंही म्हटलं आहे की, जेवण बनवण्याच्या वेळी गौरी खानला आढळले की, स्वयंपाकघरातील एक कर्मचारी खीर बनवत आहे. हे पहाताच गौरीने त्याला ताबडतोब थांबवलं आणि सांगितलं की, जोपर्यंत आर्यनची जेलमधून सुटका होत नाही तोपर्यंत घरात कोणतीही स्वीट डिश बनवली जाणार नाही.

शाहरुखने इंडस्ट्रीशी संबंधित लोकांना घरी येण्यास मनाई केली
असं म्हटले जात आहे की, गौरी खान तिच्या मुलाच्या अनुपस्थितीमुळे खूप निराश आणि अस्वस्थ आहे. आर्यन खानच्या अटकेपासून, गौरी सतत तिच्या मुलाच्या सुटकेसाठी प्रार्थना करत आहे. दुसरीकडे, शाहरुख खानने फिल्म इंडस्ट्रीशी निगडित त्याच्या मित्रांना आवाहन केलं आहे की, या कठीण काळात कोणीही त्याच्या घरी येवू नये. तो फोनद्वारे त्याच्या सहकलाकार आणि मित्रांच्या संपर्कात आहे.