किचनमध्ये शाहरुखची मुलगी सुहानाने बनविले नुडल्स, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

नवी वर्षात बॉलिवूडमधील सुपर किड्स आपल्या आगामी सिनेमांसाठी तयारी करत असताना अभिनेता शाहरुख खानची मुलगी सुहाना चक्क स्वयंपाकघरात दिसून आली. त्यामुळे ती सोशल मीडियावर चर्चेचा विषय झालेय.

Updated: Jan 12, 2018, 11:43 PM IST
 किचनमध्ये शाहरुखची मुलगी सुहानाने बनविले नुडल्स, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

मुंबई : नवी वर्षात बॉलिवूडमधील सुपर किड्स आपल्या आगामी सिनेमांसाठी तयारी करत असताना अभिनेता शाहरुख खानची मुलगी सुहाना चक्क स्वयंपाकघरात दिसून आली. त्यामुळे ती सोशल मीडियावर चर्चेचा विषय झालेय.

सोशल मीडियावर जोरदार  चर्चा

शाहरुखची मुलगी कधी मित्रांसोबत कपडे खरेदी करताना दिसून आलेय. मात्र, यावेळी ती चक्क किचनमध्ये दिसून आली. ती काहीतरी बनवत असल्याचे फोटोवरून दिसत आहे. ती काय बरे बनवत आहे, याचीच चर्चा सोशल मीडियावर जोरदार होताना दिसत आहे.

सोशल मीडियावर जो फोटो व्हायरल होत आहे, त्यावरुन ती मॅगी बनवताना दिसून येत आहे. सुहाना रात्री उशिरा मॅगी बनवत असल्याचे म्हटले जात आहे. या फोटोवरून तुम्हाला तुमचे बालपण आठवले असेल. जेव्हा भूक लागली असेल तेव्हा तुम्ही नक्कीच किचनमध्ये धाव घेतली असेल.

 

 

#Suhanakhan #cooking #shahrukhkhan #gaurikhan #photo #aryankhan

A post shared by Suhana Khan (@suhanakhanuniverse) on