मुंबई : अमेरिकेतील 'जॉर्ज फ्लॉयड' च्या हत्येनंतर अमेरिकेसह अनेक देशात 'ब्लॅक लिव्स मूवमेंट' सुरू झाली आहे. याचा परिणाम आता भारतातील फेअरनेस क्रीमवर देखील पडला आहे. अनेक टीका झाल्यानंतर हिंदुस्तान युनिलीव्हरने आपलं ब्रँड 'फेअर एँड लवली' क्रीममधून 'फेअर' हा शब्द काढून टाकला आहे. यानंतर त्वचेच्या रंगाला महत्व देणाऱ्या क्रीमबाबत चर्चा होत आहे. शाहरूख खानच्या मुलीने सुहाना खानने देखील याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
सुहाना खानने याबाबत इंस्टाग्रामवर पोस्ट केली आहे. सुहानाने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीत लिहिलं आहे की,'हिंदुस्तान युनिलीवरने घोषणा केली आहे की, ते आपल्या स्किन लाइनिंग क्रिममधून 'फेअर एँड लवल' या क्रीमला रिब्रँडिंग करणार आहेत. यातून फेअर हा शब्द काढला जाणार आहे. एवढंच नाही या जाहिरातीमधू स्किन टोनशी जोडलेल्या गोष्टी हटवल्या आहेत.'
अभिनेता अभय देओल कायमच फेअरनेस क्रीमवर कायमच टीका करत असतो. प्रियंका चोप्रा, करीना कपूसह अनेक कलाकारांनी रंगांच वर्गीकरण करणाऱ्या जाहिराती नाकारल्या आहेत.
सुहानाचे वडिल म्हणजे शाहरूख खान 'फेअर एँड हँडसम'चा ब्रँड ऍम्बेसिडर आहे. एका मुलाखतीत शाहरूख सुहानाच्या रंगावरून सांगतो की,'मी ईमानदारीने सांगतो. माझी मुलगी सावळी आहे. पण जगातील ती सर्वात सुंदर मुलगी आहे.'
सुहानाला देखील करिअरमध्ये प्रगती करून वडिलांसारख उत्तम अभिनेता व्हायच आहे. पण शाहरूखला असं वाटतं की, सुहानाने पहिलं आपलं शिक्षण पूर्ण करावं. त्यानंतर तिने करिअरच्याबाबतीत महत्वाचा निर्णय घ्यावा. सुहाना 'द ग्रे पार्ट ऑफ ब्लू'या शॉर्ट फिल्ममध्ये दिसली आहे.
सुहानाने तीन वर्ष ब्रिटनमध्ये राहून आपलं शिक्षण पूर्ण केलं आहे. पुढच्या शिक्षणाकरता ती आता न्यूयॉर्कमध्ये गेली आहे. आता तिथे ती अभिनयाचे धडे घेत आहे. सध्या सुहाना मुंबईत आहे.