शाहरूखच्या लेकीचा पहिला लघुपट प्रदर्शित

लवकरचं करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण..

Updated: Nov 19, 2019, 08:19 AM IST
शाहरूखच्या लेकीचा पहिला लघुपट प्रदर्शित

मुंबई : गेल्या दोन-तीन वर्षांपासून बॉलिवूड मधील अनेक कलाकारांच्या मुलांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. आलिया भट्ट, वरूण धवन, जान्हवी कपूर, सारा अली खान, अनन्या पांडे या बॉलिवूड किड्सने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला आहे. आता रोमान्सचा बादशाह अर्थात अभिनेता शाहरूख खानची लेक देखील अभिनयाकडे आपला मोर्चा वळवताना दिसत आहे. 

गेल्या अनेक दिवसांपासून शहारूखची लेक सुहाना खान बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार असल्याच्या चर्चा चांगल्याच रंगल्या होत्या. अखेर तिचा लघुचित्रपट प्रदर्शित झाला आहे. सुहानाचा 'द ग्रे पार्ट ऑफ ब्लू' हा लघुचित्रपट प्रदर्शित करण्यात आला आहे. 

दहा मिनिटांच्या या लघुचित्रपटात तिने उत्तम अभिनय करण्याचा प्रयत्न केला आहे. एका प्रेम कथे भोवती फिरणाऱ्या चित्रपटात तिने व्यक्तीरेखेला न्याय दिले आहे. दोन दिवसांच्या ट्रिममध्ये त्यांच्या नात्यातील खरेपणा चित्रपटाच्या माध्यमातून अनुभवता येत आहे. 

सुहाना खानचा हा पहिला सिनेमा असून चाहत्यांमध्ये याची खूप उत्सुकता पाहायला मिळत आहे. सुहानाने हा क्लासमध्ये बनवलेली शॉर्ट फिल्म असून ती मुख्य भूमिकेत आहे. सुहाना अगदी लहानपणापासूनच वडील शाहरूख खानप्रमाणे अभिनयात करिअर करू इच्छित होती. याचा खुलासा स्वतः किंग खानने केला आहे. 

सुहाना खानने याच वर्षी आपलं पदवीधर शिक्षण पूर्ण केलं आहे. पण पुढील शिक्षणाकरता ती सध्या न्यूयॉर्कमध्ये राहते. बॉलिवूडमध्ये पदार्पण करू इच्छिणाऱ्या सुहाना सुरूवातीला शिक्षण पूर्ण करण्याची अट शाहरूखने घातली आहे. असं असलं तरीही सुहाना खान आपल्या सोशल मीडियावरून चर्चेत असते. तिचा ड्रेसिंग सेन्स आणि स्टाइलमुळे ती कायमच चर्चेत असते.