शाहरुखच्या मुलाचे फेसबुक अकाऊंट हॅक!

आर्यन सध्या दक्षिण कॅलिफोर्निया विद्यापीठात शिक्षण घेत आहे.

Updated: Jan 22, 2019, 08:34 PM IST
शाहरुखच्या मुलाचे फेसबुक अकाऊंट हॅक!  title=

मुंबई : अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचे फेसबुक अकाऊंट हॅक झाले आहे. आर्यनने स्वतःच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून घडलेल्या प्रकाराची माहिती चाहत्यांना दिली. आर्यनने त्याच्या चाहत्यांना संदेश दिला आहे की माझे फेसबुक अकाऊंट हॅक करण्यात आले आहे. तर आलेल्या मेसेजकडे दुर्लक्ष करावे. आर्यन सध्या दक्षिण कॅलिफोर्निया विद्यापीठात शिक्षण घेतो आहे. आर्यन २१ वर्षांचा असून, इंन्स्टाग्रामवर त्याचे दहा लाख चाहते आहेत. काही दिवसांपूर्वीच शाहीद कपूर, अनूपम खेर, ऋषी कपूर, अभिषेक बच्चन, महेश भट्ट, करण जोहर, श्रुती हसन, अली झाफर यांचे सोशल मीडिया अकाऊंट हॅक झाले होते. 

आर्यन हा काहिसा लाजाळू असल्यामुळे तो मीडिया समोर यायचे कित्येकदा टाळतो. आर्यन अभिनय क्षेत्रात आपले नशिब आजमवण्यास बिलकूल इच्छुक नाही. हिंदुस्तान टाइम्सच्या वृत्तानुसार, दिग्दर्शक करण जोहर आर्यनला सिनेमात घेण्यासाठी इच्छुक आहेत. त्यावर शाहरुख खानने, करण जोहरला धन्यवाद म्हणत जर आर्यनला अभिनय करण्यात रस असेल तर ही संधी त्याच्यासाठी सोनचं आहे. पण मला असं वाटतं की त्याचा कल सिनेनिर्माता होण्याच्या दिशेकडे आहे. शाहरुख खान आणि करण जोहर हे एकमेकांचे चांगले मित्र आहेत. 

आर्यन सध्या सिनेनिर्माता आणि लेखक होण्याचे प्रशिक्षण घेत आहे. तर शाहरुखच्या मुलीचे उत्तम अभिनेत्री होण्याचे स्वप्न आहे. आर्यनने सिनेनिर्माता होण्याचे धडे घेत राहिले पाहिजे, त्याचबरोबर करण जोहरचा सहायक म्हणून काम करायला हवे. यासाठी त्याला आणखी ४ ते ५ वर्षे शिक्षण घ्यावे लागेल. ' ऐसा नही हैं की अगर बाप अॅक्टर हैं, तो बेटा सेट पे आके असिस्टंट डायरेक्टर बन जाए' जर सुहानाला अभिनेत्री होण्याची इच्छा असेल तर तिने आणखी ३ ते ४ वर्षे अभिनयाचे धडे गिरवायला हवेत.  माझ्या अनेक मित्रांची इच्छा आहे की माझ्या मुलांनी उद्यापासून अभिनय करण्यास सुरुवात करावी. पण माझा विश्वास आहे ते असे करणार नाहीत, असे शाहरुखने म्हटले आहे.