शाहिद कपूर - इम्तियाज अली पुन्हा आणणार जब वुई मेटची जादू

इम्तियाज अली दिग्दर्शित आणि शाहिद कपूर-करिना कपूर जोडगळीच्या जब वुई मेटने धमाल उडवून दिली होती.

Updated: Nov 29, 2017, 02:34 PM IST
शाहिद कपूर - इम्तियाज अली पुन्हा आणणार जब वुई मेटची जादू

मुंबई : इम्तियाज अली दिग्दर्शित आणि शाहिद कपूर-करिना कपूर जोडगळीच्या जब वुई मेटने धमाल उडवून दिली होती.

जब वुई मेटची टीम

2007 मध्ये आलेला हा चित्रपट तुफान यशस्वी झाला होता. परंतु दुर्दैवाने इम्तियाज अली आणि शाहिद कपूर ही जोडी पुन्हा एकत्र येऊ शकली नव्हती. शाहिद कपूर-करिना कपूर जोडीला प्रेक्षकांची प्रचंड पसंती मिळाली होती.

आगामी चित्रपट

पण आता या दोघांच्या चाहत्यांसाठी खूषखबर आहे. लवकरच या दोघांचा चित्रपट येतोय. पुढच्या वर्षी एप्रिलपासून त्याचं चित्रिकरण सुरू होतेय. जब वुई मेट नंतर इम्तियाज अलीने अनेक चित्रपटांचं दिग्दर्शन केलंय. त्यात लव आज कल, रॉकस्टार, कॉकटेल, हायवे, तमाशा आणि जब हॅरी मेट सॅली या चित्रपटांचा समावेश आहे. 

शाहिदबरोबरची हीट जोडी

शाहिदबरोबर येणारा इम्तियाजचा नवा चित्रपट जब वुई मेटपेक्षा जास्त यशस्वी होईल, अशी आशा करूया. सध्या शाहिद संजय लीला भंसाळीचा पद्मावती प्रदर्शित होण्याची वाट बघतोय. त्यात शाहिदने राजपूत योद्धा महारावल रतन सिंहची भूमिका रंगवली आहे.