दोन लग्न तुटल्यानंतर शाहीद कपूरची आई म्हणते...

 नीलिमा यांचं पहिलं लग्न पंकज कपूरसोबत तर दुसरं लग्न राजेश खट्टरसोबत झालं होतं. 

Updated: Apr 13, 2021, 07:54 AM IST
दोन लग्न तुटल्यानंतर शाहीद कपूरची आई म्हणते...

मुंबई :  बॉलिवूड अभिनेत्री आणि शाहीद कपूरची आई नीलिमा अजीम (Neelima Ajeem) यांनी त्यांचं अयशस्वी ठरलेल्या लग्नाबद्दल  खुलासा केला आहे. नीलिमा यांचं पहिलं लग्न पंकज कपूरसोबत  झाला. दोघांचा मुलगा म्हणजे अभिनेता  शाहीद कपूर. पंकज कपूरला सोडचिट्टी दिल्या नीलिमा यांनी दुसरं लग्न राजेश खट्टरसोबत केलं. नीलिमा-राजेश यांचं नात  देखील फार काळ टिकलं नाही. नीलिमा यांचं देन लग्न का अयशस्वी राहिले याचा खुलासा त्यांनी एका मुलाखतीत केला. 

पहिलं लग्न तुटल्यानंतर नीलिमा यांना प्रचंड त्रास झाला होता. त्या म्हणाल्या, 'माझ्या एका मित्राचं लग्न होतं. सगळं काही व्यवस्थित सुरू होतं. माझ्या अवती-भोवती अनेक चांगली माणसं होती. पण मला माहित नव्हतं की माझ्या आयुष्यात असं काही होईल. ज्यामुळे पाय अडकेल आणि आपण पडू. विभक्त होण्याचं काही कारण नव्हतं..पण  अचानक सर्व काही संपलं. ' या सर्व परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी मला जवळपास दोन वर्ष लागली असं देखील नीलिमा म्हणाल्या. 

दुसऱ्या लग्नाबद्दल नीलिमा म्हणाल्या. थोडं संयम असतं तर राजेशसोबल लग्न टिकलं असतं. काही गोष्टींकडे दुर्लक्ष करणं चूकीच होतं. जर नातं टिकवण्याचा प्रयत्न केला असता, तर नातं तुटलं नसतं. राजेश-नीलिमा विभक्त झाले असले तरी एकमेकांचे चांगले मित्र आहेत. त्यांच्या मैत्रीचं संपूर्ण श्रेय राजेश यांच्या दुसऱ्या पत्नी वंदना यांना जातं. 

वंदना कायम नीलिमा यांना कुटुंबात उच्च स्थान देतात. लग्नात समजदारी, त्यागाची भावना, एकमेकांप्रती आदर सन्मान असेल तर नातं कधीच तुटतं नाही. नात्यांत सर्वात महत्त्वाचा असतो तो म्हणजे विश्वास. विश्वास असेल तर नातं दिर्घ काळ टिकतं.