शाहरूखच्या मुलीने निवडला जोडीदार, बॉलीवूडमधील या घराण्याची होणार सून?

आर्यन खानमुळे शाहरुखचे नाव सतत चर्चेत होते. त्यानंतर आता शाहरुख त्याची मुलगी सुहाना खानमुळे चर्चेत आहे.

Updated: Jan 6, 2022, 03:23 PM IST
 शाहरूखच्या मुलीने निवडला जोडीदार, बॉलीवूडमधील या घराण्याची होणार सून? title=

मुंबई : बॉलिवूडचा बादशाह म्हणजेच शाहरुख खान त्यांच्या रोमॅन्टिक अंदाजासाठी विशेष ओळखला जातो. करिअरच्या सुरुवातीपासून त्याने आपल्या चित्रपटातील भूमिकेमधून रोमान्सचा बादशाह अशी ओळख निर्माण केली आहे. 
शाहरुख खान हा बॉलीवूडचा खूप मोठा आणि प्रसिद्ध अभिनेता आहे. ज्यामुळे आजच्या काळात त्याचे बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये एकतर्फी नाव आहे. शाहरुख खान बॉलीवूडमधील सर्वात मोठ्या अभिनेत्यांपैकी एक आहे आणि ज्याची फॅन फॉलोविंग जगभरात आहे.

शाहरुख खान सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे, आर्यन खानमुळे शाहरुखचे नाव सतत चर्चेत होते. त्यानंतर आता शाहरुख त्याची मुलगी सुहाना खानमुळे चर्चेचा विषय बनतो आहे. 

Pictures: Fans go gaga over SRK's daughter Suhana's wedding style - Life &  Style - Business Recorder

कारण सुहाना खान सध्या एका मुलासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचं बोललं जात आहे. सुहाना एका बॉलिवूड घराण्याची सून बनेल अशी ही चर्चा रंगते आहे. त्याच कारण म्हणजे सुहानाचे एका स्टार किडसोबतचे फोटो व्हायरल होत आहेत.

ती बॉलिवूड स्टार चंकी पांडेच्या घरची सून होणार असून, शाहरुख सुहानाच्या लग्नासाठी चंकी पांडे यांच्या घरी जाणार असल्याचं समजतंय. एका पोर्टलने ही माहिती शेअर केली आहे.  

सुहाना खान कोणाच्या प्रेमात 

सुहाना खानचा सध्या सोशल मीडियावर बोलबाला आहे, त्यामुळे सध्या प्रत्येकजण तिच्याबद्दल बोलत आहे.  सुहाना खान सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे खूप चर्चेत आहे.सुहाना खान सध्या एका मुलाला डेट करत आहे, ज्याचे नाव अहान पांडे आहे. अहान हा अभिनेत्री अनन्या पांडेचा भाऊ आहे.

सुहाना खान आणि अनन्या पांडेचा भाऊ अहान पांडेसोबत खूप दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये आहे. दोघेही बहुतेकदा एकत्र दिसतात. त्यामुळेच या दोघांचे फोटो सर्वत्र व्हायरल होत आहेत. शाहरुखची लाडकी मुलगी तिच्या नात्याबद्दल खूप गंभीर आहे आणि त्यामुळेच त्यांच्या नात्याची सगळीकडे चर्चा होत आहे.