Shahrukh Khan Divorce : शाहरुख खान आणि गौरी घेणार घटस्फोट? गौरी म्हणाली, ''त्याला माझ्यासोबत...''

Shahrukh Khan Divorce with gauri  : आयडियल कपल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गौरी आणि शाहरुखवर ही वेळ का आली ? याचा स्वतः गौरीने खुलासा केला आहे...

Updated: Feb 3, 2023, 08:16 PM IST
Shahrukh Khan Divorce : शाहरुख खान आणि गौरी घेणार घटस्फोट? गौरी म्हणाली, ''त्याला माझ्यासोबत...''

Shahrukh Khan Gauri Khan separate: सध्या, शाहरुख खान त्याच्या पठाण (Shahrukh Khan pathaan movie superhit) सिनेमाच्या यशामुळे चांगलाच चर्चेत आहे. पठाण सिनेमा भरपूर ट्रोल झाला मात्र त्यातूनही या सिनेमाने घवघवीत यश मिळवलं आणि शाहरुख खान म्हणजेच बॉलिवूडचा बादशाह.त्याने आपला डंका मिरवलाच. पुन्हा एकदा त्यानं आपलं वर्चस्व सिद्ध केलं आहे. 

शाहरुख खानची , फॅमिली मॅन म्हणून वेगळी ओळख आहे. शिवाय शाहरुख आणि गौरी खान हे बॉलिवूडमधील पॉवर कपल म्हणून ओळखले जातात. मात्र गौरीच्या एका वक्तव्याने चांगलीच खळबळ माजवली आहे. हे वक्तव्य वाऱ्यासारखं पसरलं आहे आणि सगळीकडे याची बरीच चर्चा होऊ लागली आहे.  (Shahrukh Khan Divorce with gauri )

ज्या वक्तव्याने शाहरुख आणि गौरीच्या एवढ्या वर्षांच्या संसारावर प्रश्नचिन्ह उभं राहीलं आहे, ते म्हणजे गौरीला शाहरुखपासून वेगळं व्हायचंय. हो, ऐकून तुम्हालाही धक्का बसला ना ? गौरीने स्वतः एका शो मध्ये शाहरुख खानपासून वेगळं होण्याचं कारण सांगितलं आहे. 

गौरीचं वक्तव्य ऐकलं तर त्यावर हेच वाटत आहे गौरी, शाहरुखपासून विभक्त होण्याची वाट पाहत आहे. सध्या गौरीच्या वक्तव्यावर सगळीकडून प्रतिक्रिया येतं आहेत. 

का म्हणाली गौरी असं... 

जो व्हिडीओ आणि व्हिडिओमधील स्टेटमेंट व्हायरल होतंय, तो व्हिडीओ आहे साल 2005 मधील. कॉफी विथ करण (Coffee with karan) या शो मधील हा एक इंटरव्ह्यू आहे. ती सुजैन खानसोबत या शोमध्ये पोहोचली होती. करण जोहरने गौरी खानला प्रश्न केला की, शाहरुखला इतर महिलांकडून एवढं अटेंन्शन मिळतंय हे पाहून तिला असुरक्षित वाटत नाही का? गौरीने या प्रश्नाला उत्तर देत सांगितलं की, तिला हा प्रश्न अनेकदा विचारलं जात असल्याने ती याला कंटाळली आहे. (shahrukh khan gauri khan will separate soon said gauri khan she wants to leave shahrukh khan)

करण जोहरशी बोलताना किंग खानच्या पत्नीने खुलासा केला की,  तिला ''काही काळ पतीपासून वेगळं व्हायचं आहे.जेणेकरून शाहरुखला वैयक्तिक जागा मिळेल आणि तो स्वत:साठी वेळ देऊ शकेल''. (Shahrukh Khan Divorce with gauri )

शिवाय एका मुलाखतीदरम्यान तिने म्हटलं होतं . ''मला वाटतं, जर त्याला दुसऱ्या कुणासोबत राहावसं वाटत असेल,  तर मी त्याच्यासोबत राहणार नाही. मी म्हणेन, छान, मस्त! मी देखील कोणासोबत माझ्या आयुष्यात पुढे जाईन.''

हे सगळं ऐकून तुम्हालाही दोघांसाठी वाईट वाटत असेल तर थांबा ! गौरी खान हे सर्व बोलिये हे जरी खरं असाल तरी ही मुलाखत आहे फार जुनी . त्यामुळे दोघांमध्ये सर्वकाही आलबेल आहे दोघे आजही एकत्र आहेत आणि सुखाने संसार करत आहेत. (shahrukh khan gauri khan will separate soon said gauri khan she wants to leave shahrukh khan)