Fact Check : ऐश्वर्या राय बच्चनचा आत्महत्येचा प्रयत्न ? धक्कादायक सत्य आलं समोर

Aishwarya Rai Bachchan suicide fact check  : डिप्रेशन ताण तणावाचे आजकाल सर्वजणच बळी पडत आहेत. म्हणून स्वतःच आयुष्य संपवणं याला काहीही अर्थ नाहीये, आपल्या जाण्याने मागे राहिलेल्या कुटुंबावर काय परिणाम होतं असेल याची कोणीही कल्पना करू शकत नाही . 

Updated: Feb 3, 2023, 07:12 PM IST
Fact Check : ऐश्वर्या राय बच्चनचा आत्महत्येचा प्रयत्न ? धक्कादायक सत्य आलं समोर

Fact Check Aishwarya Rai bachchan Suicide: आयुष्य हे फार सुंदर आहे , फक्त ते जगता आलं पाहिजे असं कुणीतरी म्हणून ठेवलं आहे आणि ते तितकंच खरदेखील आहे. पण बारायचदा आयुष्यात असे काही प्रसंग येतात की, आपण हार मानून बसतो. आपल्यासमोर जगण्यासाठी कुठलाच पर्याय नाही असं मानून, जीवन संपवण्याचा निर्णय घेतो. बॉलिवूड मध्ये अशा अनेक घटना घडल्या आहेत. काही अभिनेते आणि अभिनेत्री डिप्रेशनमध्ये (Actress suicide due to depression) येऊन स्वतःच जीवन संपवण्याचा निर्णय घेतात. त्यांच्या चाहत्यांसाठीसुद्धा हा मोठा धक्का असतो.  

अमिताभ बच्चन यांची सून ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya rai bachchan suicide news) ही आजही तिच्या आरस्पानी सौंदर्याने जगाला वेड लावतेय. मुलीच्या जन्मानंतर ऐश्वर्याने बॉलिवूडपासून फारकत घेतली. अगदी नाही म्हणायला तिने १-२ सिनेमे केले खरे , पण त्यात फार काही दम नव्हता.  चाहते मात्र आजही ऐश्वर्याच्या बाबतीत प्रत्येक गोष्ट जाणून घ्यायला उत्सुक असतात. (Aishwarya Rai Bachchan tried to Commits Suicide news will shock you know the truth )  

सध्या ऐश्वर्याचा एक जुना फोटो व्हायरल (viral) होत आहे. ज्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.बॉलिवूडची  सुप्रसिद्ध अभिनेत्री बच्चन कुटुंबीयांची सून ऐश्वर्या बच्चन नेहमी आपल्या चाहत्यांना तिचे अपडेट्स, फोटो आणि व्हिडिओच्या माध्यमातून देतच असते.   

मिस वर्ल्ड जिंकल्यानंतर ऐश्वर्याच्या पुढ्यात एक ना अनेक चित्रपटांची रांग लागली होती. यावेळी ऐश्वर्याने अनेक सुपरहिट सिनेमेदेखील केले. त्या अभिनेत्रींमध्ये ऐश्वर्या रायची गणना होते. 

ऐश्वर्याने आत्महत्या केल्याची अफवा वाऱ्यासारखी पसरली 

कलाकार म्हटलं की, त्यांच्या बाबतीत अनेक वावड्या उठणं हे सात्यत्याने आलंच. कलाकारांचं आयुष्य आपल्याला बाहेरून जितकं चमचमत दिसत तितकंच ते खऱ्या आयुष्यात असेलच असं नाही. अनेक अफवांचा सामना करूनच कलाकार मोठा होतो असं म्हणतात, ऐश्वर्या राय बच्चनही या अफवेची बळी ठरली होती.  (Fact Check Aishwarya Rai bachchan Suicide)

अलीकडेच तिच्या आत्महत्येची खोटी बातमी सोशल मीडियावर व्हायरल होत असून एका रिपोर्टमध्ये सासू-सासऱ्यांसोबत झालेल्या वादामुळे ऐश्वर्या रायने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा दावा करण्यात आला आहे. ट्रँक्विलायझरचा ओव्हरडोज घेऊन तिने स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केल्याचं म्हटलं होतं. व्हॉट्सअॅप आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा मेसेज व्हायरल होऊ लागला आहे आणि त्यात असंही बोललं जात आहे की, ए दिल है मुश्किल या चित्रपटात ऐश्वर्या रायसोबत रणबीर कपूरने अमिताभ बच्चन आणि इंटिमेट सीनमुळे (Aishwarya rai bachchan intimate scene) जया बच्चन नाराज झाल्या आहेत. 

व्हायरल होत असलेल्या बालमीत कसलंही तथ्य नाही 

पूर्ण चौकशी अंती, हे समोर आलं आहे की,  व्हायरल होतं असलेला फोटो आणि बातमी यांचा एकमेकांशी काहीही संबंध नाहीये. व्हायरल झालेला फोटो हा एका शूटिंगदरम्यानचा आहे ज्यावेळी तिला छोटीशी दुखापत झाली होती आणि म्हणून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यामुळे, ऐश्वर्याने आत्महत्येचा प्रयत्न केला ही बातमी निव्वळ अफवा असून  होणारी चर्चा पूर्णपणे खोटी आहे.