मुंबई : ड्रग्स प्रकरणात अटक करण्यात आलेला शाहरुख खानचा मुलगा आर्यनला त्याचे मित्र अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचासह 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. 7 ऑक्टोबर रोजी झालेल्या न्यायालयीन सुनावणी दरम्यान, एनसीबीने सगळ्या आरोपींची 11 ऑक्टोबरपर्यंत कोठडी मागितली होती. मात्र न्यायाधीशांनी त्यांना न्यायालयीन कोठडीमध्ये पाठवलं. मिळालेल्या माहितीनुसार, सुनावणीदरम्यान शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी सतत रडत होती.
एका अहवालानुसार, सुनावणीदरम्यान शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानी न्यायालयात उपस्थित होती. आर्यनची अवस्था पाहून ती खूप अस्वस्थ झाली आणि रडू लागली. 2 दिवस आधी पूजा ददलानी आर्यन खानला भेटण्यासाठी एनसीबी कार्यालयाबाहेरदेखील दिसली होती. पण त्यावेळी ती आर्यनाला भेटू शकली की नाही, हे माहीत नाही.
आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांना 2 ऑक्टोबर रोजी मुंबईत क्रूझ रेव्ह पार्टीवर छापा टाकल्यानंतर अटक करण्यात आली. त्याच दिवशी त्याला 1 दिवस एनसीबी कोठडी देखील देण्यात आली. यानंतर, 4 ऑक्टोबर रोजी न्यायालयात झालेल्या सुनावणीनंतर एनसीबीने अनेक धक्कादायक दावे केले.
एनसीबीने दावा केला की, अरबाज, आर्यन आणि मुनमुन यांच्या फोनवरून अशा अनेक वस्तू सापडल्या आहेत, ज्यामुळे चौकशीसाठी पुढील कोठडी आवश्यक आहे. एनसीबीने तिघांवर ड्रग्ज घेतल्याचा आरोप केला आहे. असा दावा करत की त्यांच्या व्हॉट्सअॅप चॅट्स आंतरराष्ट्रीय ड्रग ट्रॅफिकिंगकडे निर्देश करतात. 7 ऑक्टोबर रोजी न्यायालयीन सुनावणी दरम्यान, एनसीबीने आर्यन खान, अरबाज आणि मुनमुन यांची 11 ऑक्टोबरपर्यंत कोठडी मागितली होती, मात्र आता आर्यन खानचा जामिन किल्ला कोर्टानं फेटाळला आहे. आर्यनला आज तुरुंगातच रहावं लागणार आहे, आर्यन आज आर्थर रोड जेलमध्येच आहे. आर्यनसोबत अजून तीन आरोपींचे देखील जामिन कोर्टाने फेटाळला आहे.