'शाहरूखने माझ्या आयुष्याची वाट लावली...' तरूणीचा किंग खानवर आरोप

शाहरूख खानने सिनेमात केलेला रोमान्स या सगळ्याला जबाबदार 

Updated: Apr 29, 2021, 10:43 AM IST
'शाहरूखने माझ्या आयुष्याची वाट लावली...' तरूणीचा किंग खानवर आरोप

मुंबई : शाहरूख खान हा फक्त बॉलिवूडमधला अभिनेता नाही तर ही ओळख आहे रोमान्सच्या बादशाहची. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी प्रेक्षकांना प्रेम करायला शिकवलं. पण शाहरूख सारखं प्रेम मिळवणं कुणालाच जमलं नाही. नव्वदीच्या दशकापासून ते अगदी आतापर्यंत शाहरूख साररखा रोमांस कुणीच केला नाही. (Shahrukh Khan ruined My Life, Interesting story of Mumbai Girl, post goes viral on Social Media ) पण याच शाहरूख खानने आमचं आयुष्य उद्ध्वस्त केलं असा दावा एका जोडप्याने केलं आहे. 

ही गोष्ट ह्यूमन्स ऑफ मुंबईच्या इंस्टाग्राम पेजवर सांगितली आहे. या गोष्टीची सुरूवात 'शाहरूख खानने माझ्या आयुष्याची वाट लावली', अशी आहे. शाहरूख खानचे सिनेमे बघून ही तरूणी अशाच प्रेमाची अपेक्षा करू लागली. शाहरूख आपल्या अभिनेत्रींवर जसं प्रेम करायचा तसंच प्रेम त्या मुलीला आपल्या आयुष्यात अपेक्षित होतं. पण ते न मिळाल्यामुळे तिने शाहरूख खानवर आरोप केले आहेत. 

या तरूणीने लिहिलं आहे की,'शाहरूखने माझं संपूर्ण आयुष्य खराब करून टाकलं. लहानपणापासूनच मी स्वप्न पाहिलं होतं की, माझा परफेक्ट मला अतिशय खास पद्धतीने प्रपोझ करेल. बॅकग्राऊंडला वॉयलिन वाजत असताली. तो मला प्रेमाने उठवेल. आणि तो गुडघ्यावर बसेल आणि मला अंगठी घालेल... पण असं माझ्या आयुष्यात काहीच घडलं नाही.'

तसेच या मुलीने आपल्या बंगाली आई-वडिलांना सांगितलं की, तिला पंजाबीच मुलाशी लग्न करायचं आहे. आम्ही तीन वर्ष एकमेकांना डेट केलं आहे. आमचा सर्वाधिक वेळ हा कुटुंबियांना जवळ आणण्यातच गेला. या सगळ्यातच आमचा वेळ गेला आणि फिल्मीपद्धतीने प्रपोझ मला केलंच नाही.