चहलकडून घटस्फोटावर शिक्कामोर्तब? घरच्यांचा उल्लेख करत केलेल्या पोस्टमधून 'तो' शब्द मुद्दाम वगळला?

Yuzvendra Chahal Breaks Silence on Divorce : युझवेंद्र चहल हा गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या घटस्फोटामुळे चर्चेत आहे. आता त्यानं या सगळ्यावर मौन सोडलं आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Jan 10, 2025, 12:16 PM IST
चहलकडून घटस्फोटावर शिक्कामोर्तब? घरच्यांचा उल्लेख करत केलेल्या पोस्टमधून 'तो' शब्द मुद्दाम वगळला? title=
(Photo Credit : Social Media)

Yuzvendra Chahal Breaks Silence on Divorce : भारतीय क्रिकेटपटू युझवेंद्र चहल आणि धनश्री या दोघांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यात सगळं काही ठीक नाही. त्यामुळे त्या दोघांच्या घटस्फोटाची चर्चा सुरु आहे. या सगळ्या बातम्या समोर आल्यानंतर सगळ्यांना आश्चर्य झालं. ही बातमी आल्यानंतर चहल आणि धनश्री सोशल मीडियावर पोस्ट करताना दिसत आहेत. नुकतंच धनश्रीनं त्या सगळ्या बातम्यांवर मौन सोडत एक पोस्ट शेअर केली होती. त्यानंतर आता चहलनं एक पोस्ट शेअर केली आहे.

चहलनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून त्याचे धनश्रीसोबतचे फोटो डिलीट केले होते. तेव्हाच अशा बातम्या येऊ लागल्या होत्या की त्यांच्यात सगळं काही ठीक नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यामुळे चहल आणि धनश्रीमध्ये असलेल्या घटस्फोटाच्या बातम्या आणखी वाढल्या आहेत. या रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला की चहल आणि धनश्रीनं एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. 

 

Yuzvendra Chahal breaks his silence on divorce rumours with Dhanashree Verma

या सगळ्यात चहलनं इन्स्टाग्रामवर एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. त्यात चहलनं लिहिलं की 'माझ्या चाहत्यांनी दिलेल्या प्रेम आणि समर्थनासाठी मी त्यांची आभारी आहे. ज्याशिवाय मी इथे पोहोचू शकले नसते. पण हा प्रवास अजून संपलेला नाही कारण मला माझ्या देशासाठी, टीमसाठी आणि चाहत्यांसाठी आणखी अनेक ओव्हर खेळायच्या आहेत. एक खेळाडू असण्यावर मला गर्व आहे. पण मी एक मुलगा, भाऊ आणि कोणाचा मित्र देखील आहे. सध्या माझ्या खासगी आयुष्याविषयी जाणून घेण्याच्या चाहत्यांच्या उत्सुकतेला मी समजू शकतो. मी काही सोशल मीडियावर सुरु असलेल्या चर्चा पाहिल्या ज्या खऱ्या असू शकतात आणि नसू ही शकतात.' 

चहल पुढे या पोस्टमध्ये म्हणाला, 'एक मुलगा, भाऊ आणि मित्र असल्याच्या नात्यानं मी सगळ्यांना आग्रह करतो की या अफवांवर लक्ष देऊ नका कारण त्यामुळे मला आणि माझअया कुटुंबाला दु:ख होऊ शकतं. माझ्या कौटुंबिक मूल्यांनी मला नेहमीच सर्वांच्या चांगल्याचा विचार करण्यास शिकवले आहे. इतकंच नाही, तर मी कायम शॉर्टकट न घेता वेळ घेऊन आणि मेहनत करत यशस्वी होणं शिकलो आहे. नेहमीच तुमचं प्रेम आणि समर्थन मिळेल यासाठी मी प्रयत्न करेन. सगळ्यांना खूप प्रेम.'

हेही वाचा : Nagarjuna Fitness Mantra : वयाच्या 65 व्या वर्षी नागार्जुन इतका उत्साही आणि फिट कसा? नेमकं रहस्य काय?

या पोस्टमध्ये मुलगा, भाऊ आणि मित्र अशा सगळ्या नात्यांचा उल्लेख असला तरी नवरा असा उल्लेख दिसून येत नसल्यानं ही पोस्टमध्ये अप्रत्यक्षपणे घटस्फोटावर शिक्कामोर्तब असल्याची चाहत्यांमध्ये चर्चा आहे. अनेकांनी चहलनं नवरा या शब्दाचा उल्लेख का टाळला असा सवाल उपस्थित केला आहे. त्याशिवाय चहलनं ठेवलेल्या स्टोरीचे स्क्रिनशॉट व्हायरल होत आहेत.