स्टारकिडचे ग्लॅमरस फोटो आले समोर, फोटो पाहून चाहते थक्क

बॉलिवूड पदार्पणाआधीच 'या' स्टारकिडने ओलांडल्या सर्व मर्यादा,  फोटो पाहिलेत का तुम्ही? 

Updated: Oct 2, 2022, 09:46 PM IST
  स्टारकिडचे ग्लॅमरस फोटो आले समोर, फोटो पाहून चाहते थक्क title=

मुंबई : सोशल मीडियावर (Social media) अभिनेत्रींचे अनेक फोटो व्हायरल असतात. असाच एक स्टारकिडचा (Starkid) फोटो व्हायरल होत आहे. या फोटोने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.नेमकी ही स्टारकिड कोण आहे? व तिचा फोटो व्हायरल होण्यामागचे कारण काय आहे ते जाणून घेऊयात.  

सोशल मीडियावर चर्चेत असलेली स्टारकिड ही शनाया कपूर (Shanaya Kapoor) आहे. शनाया कपूर ही बॉलिवूड अभिनेता संजय कपूर आणि महीप कपूर यांची मुलगी आहे. शनाया कपूर ही बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याची चर्चा आहे. या चर्चेनंतर ती सोशल मीडियावर नेहमीच चर्चेचा विषय ठरली आहे. 

स्टारकिड शनाया कपूर (Shanaya Kapoor) ही दिसायला खुप सुंदर आहे. तिच्या लूकमुळे ती अनेकदा सोशल मीडियाच्या चर्चेत असते. दरम्यान आता तिचा एक ग्लॅमरस फोटो समोर आला आहे. या फोटोची सोशल मीडियावर खुप चर्चा रंगली आहे. 

फोटोत काय? 
शनाया कपूरने (Shanaya Kapoor) तिच्या व्हेकेशनचा एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोत ती एका पुलमध्ये बिकनीत दिसत आहे. फोटोत ती खुपच ग्लॅमरस दिसत आहे. तिचा हा लुक पाहून चाहते थक्क झाले आहेत. तिच्य़ा या लुकची सोशल मीडियावर चर्चा आहे. तिने या पोस्टला 'हॅपी फेस' असे कॅप्शन दिले आहे. दरम्यान शनाया कपूर जेव्हा जेव्हा तिचे फोटो शेअर करते, त्यावेळी तिची चर्चा सोशल मीडियावर चर्चा होते. या फोटोच्या बाबतीतही तसेच झाले आहे. 

सुहाना खानची कमेंट 
शनाया कपूरच्या (Shanaya Kapoor) या फोटोवर तिची बेस्ट फ्रेंड आणि बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानची (Shahrukh khan) मुलगी सुहाना खाननेही कमेंट केली आहे. सुहाना खानने (Suhana khan) "तुझी आठवण येते." अशी कमेटं केली आहे.  

दरम्यान शनाया कपूरच्या (Shanaya Kapoor) प्रोफेशनल लाईफबद्दल बोलायचे झाले तर ती, करण जोहरच्या (Karan johar) 'बेधडक' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग 2023 मध्ये सुरू होणार आहे. या चित्रपटाची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे.