Ashneer Grover Wife Revelation: शार्क टँकमुळे प्रसिद्धीस आलेले 'भारत पे'चे (Bharat Pe) संस्थापक अशनीर ग्रोव्हर (Ashneer Grover) आणि त्यांची पत्नी माधुरी जैन यांनी नुकतीच अभिनेत्री अमृता राव (Amrita Rao) आणि आरजे अनमोल (RJ Anmol) यांच्या पॉडकास्टला हजेरी लावली. यावेळी त्यांनी आपल्या खासगी आयुष्याबद्दल काही खुलासे केले. यावेळी अशनीर ग्रोव्हर यांनी सांगितलं की, एकदा आपण मौनी रॉयच्या बिकिनीमधील फोटोला लाइक केलं होतं, त्यानंतर पत्नीने आपला चांगलाच क्लास घेतला होता. यानंतर आपल्याला इन्स्टाग्रामवर मौनी रॉयला अनफॉलो करावं लागलं होतं.
दरम्यान या मुलाखतीत अशनीर ग्रोव्हर आणि माधुरी जैन यांनी आपल्या वैवाहिक आयुष्यासह संघर्षातील दिवसांच्या आठवणी सांगितल्या. यावेळी त्यांनी काही किस्सेही सांगितले. कशाप्रकारे आपण एका खोलीत राहायचो हे सांगितलं. तसंच आपण बाथरुममध्ये एकत्र आंघोळ करायचो असा खुलासा केला.
अशनीर ग्रोव्हर आणि माधुरी जैन यांनी सांगितलं की, लग्नानंतर ते मुंबईत 1BHK फ्लॅटमध्ये राहत होते. जेव्हा अशनीर कामावरुन परत यायचे, तेव्हा मी त्यांना टोमॅटो आणण्यासाठी पाठवायची अशी आठवण माधुरी जैन यांनी सांगितलं. दरम्यान आम्ही राहायचो तिथे आता मोठमोठ्या इमारती उभ्या राहिल्या असून, सर्व काही बदललं असल्याची माहिती त्यांनी दिली. आपल्या 16 वर्ष जुन्या आठवणी सांगताना त्यांनी कामानिमित्त आपण दिल्लीहून मुंबईला शिफ्ट झाला होतो असं सांगितलं.
माधुरी जैन यांनी सांगितलं की, "आमच्या घरात एक टेबलही नव्हता. आम्ही जमिनीवर बसून जेवायचो. आम्ही आमच्या एक महिन्याच्या पगारातून फर्निचर खरेदी केलं होतं. एकदा अशनीरने लकी ड्रॉमध्ये 12 लाखांची बाईक जिंकली होती. मी त्याला बक्षिसात अजून काय आहे असं विचारलं असता त्याने एलसीडी टीव्ही होता असं सांगितलं. तेव्हा मी त्याला तेच आणायला हवं होतं असं म्हटलं होतं". 48 हजारांच्या पगारात आम्ही मुंबईत राहत होतो असं माधुरी जैनने सांगितलं आहे.
माधुरी जैन यांनी सांगितलं की, "आम्ही 16 हजार रुपये भाडं देत होते. आमचे इतर पैसे चित्रपट पाहण्यात जायचे. आम्ही प्रिमियम सीट घ्यायचो आणि चांगलं जेवायचो. आम्ही अमेरिका आणि कॅनडालाही जायचो. त्यावेळी डॉलर 40 रुपये होता". याशिवाय दोघांनी आपले काही स्पेशल मोमेट्सही शेअर केले. अनशीरने सांगितलं की, काही स्पेशल नव्हतं, आमच्याकडे फक्त एकच बाथरुम होतं. त्यावर माधुरी जैन यांनी लगेच सांगितलं की, आम्ही दोघं एकत्र आंघोळ करायचो. तिथे फक्त एकच बाथरुम होतं आणि ऑफिसला जाण्यासाठी वेळही नसायचा.
"आमच्या घऱात एकच बाथरुम होतं आणि ऑफिसला जाण्याची वेळ व्हायची. त्याचवेळी अशनीरची बहीण आम्हाला भेटण्यासाठी येत असे. आम्ही दोघेही जागेवर नाही हे पाहून तिला आश्चर्याचा धक्का बसत असे," असं माधुरी जैन यांनी सांगितलं आहे.
यावेळी दोघांनी खुलासा केला की, पहिली प्रेग्नंसी फार गुंतागुंतीची होती. डॉक्टरांना मूल पाडण्याचा सल्ला दिला होता. आम्ही बाळासाठी तयार होतो. पण जेव्हा डॉक्टर असं काह सांगतात तेव्हा मानसिक त्रास होते. पण आमच्याकडे दुसरा पर्याय नव्हता.