...म्हणून नागराज मंजुळेंनी धडक पाहावा!

बहुचर्चित, बहुप्रतिक्षीत 'धडक' हा सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे.

Updated: Jul 12, 2018, 01:27 PM IST
...म्हणून नागराज मंजुळेंनी धडक पाहावा!

मुंबई : बहुचर्चित, बहुप्रतिक्षीत 'धडक' हा सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. मराठीत सैराट हा सुपरहिट ठरल्याने याच्या हिंदी रिमेकबद्दल प्रेक्षकांमध्ये सुरुवातीपासूनच उत्सुकता होती. त्याचबरोबर बॉलिवूडच्या दिवंगत दिग्गज श्रीदेवींची मुलगी जान्हवी कपूर या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पर्दापण करणार आहे. काही दिवसांपूर्वी सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला त्यानंतर धडक सिनेमाची गाणी प्रेक्षकांच्या भेटीला येऊ लागली. आता २० जुलैला सिनेमा प्रदर्शित होणार आहे. धडक सिनेमा दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी पाहावा, अशी इच्छा 'धडक'चे दिग्दर्शक शशांक खैतान यांनी व्यक्त केली आहे.

सिनेमाचे दिग्दर्शकांना याची प्रतीक्षा

नुकत्याच झालेल्या मुलाखतीत शशांक खैतान म्हणाले की, नागराज मंजुळे यांनी धडक पाहावा व त्यावर प्रतिक्रिया द्यावी, याची मी वाट पाहत आहे. नागराज आणि त्याच्या टीमसाठी शशांक स्पेशल स्क्रिनिंगचं आयोजनदेखील करणार आहे. त्याचबरोबर नकारात्मक प्रतिक्रीयांनाही सामोरे जाण्यास मी तयार असल्याचे शशांक याने सांगितले.

धडकला येणार का सैराटची सर?

धडकमधील झिंगाट आणि पहिली बार या गाण्यांना प्रेक्षकांच्या संमीश्र प्रतिक्रिया मिळाल्या होत्या. तर सैराट तुलतेने धडकमधील गाणी आणि ट्रेलर प्रेक्षकांना फारसा भावलेला दिसला नाही. तरी देखील सिनेमाला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळेल, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.