या कारणासाठी शहनाज गिल झाली सिद्धार्थच्या आठवणीत पुन्हा भावुक

शहनाज गिल आणि सिद्धार्थ शुक्लाचा शेवटचा म्युझिक व्हिडिओ 'हॅबिट' रिलीज झाला आहे. 

Updated: Oct 20, 2021, 09:06 PM IST
या कारणासाठी शहनाज गिल झाली सिद्धार्थच्या आठवणीत पुन्हा भावुक

मुंबई : शहनाज गिल आणि सिद्धार्थ शुक्लाचा शेवटचा म्युझिक व्हिडिओ 'हॅबिट' रिलीज झाला आहे. हे गाणं रिलीज होताच सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर धूमाकुळ घालत आहे. बॉलिवूड गायिका श्रेया घोषाल हिने आपल्या मधुर आवाजाने हे गाणे गायलं आहे. शहनाज आणि सिद्धार्थने गाण्यात परफॉर्म केला आहे. शहनाज गिल आणि सिद्धार्थ शुक्लाच्या या गाण्याला रिलीज होवून थोडाच वेळ झाला आहे मात्र हे गाणं आतापर्यंत 5 लाखांपेक्षा जास्त वेळा पाहिले गेलं आहे.

शहनाज गिल आणि सिद्धार्थ शुक्ला यांच्या म्युझिक व्हिडीओमध्ये शहनाज खूप निराश दिसत आहे. हे गाणं बीच लोकेशनवर शूट झालं आहे. सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूनंतर चाहत्यांमध्ये खूप निराशा होती की, आता ते कधीही शहनाज आणि तिला एकत्र पाहू शकणार नाहीत. सारेगामापा म्युझिकच्या बॅनरखाली हे गाणं रिलीज करण्यात आलं आहे.

शहनाज गिल आणि सिद्धार्थ शुक्लाच्या या म्युझिक व्हिडिओवर चाहते भरभरून प्रेम करत आहेत. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, दिडमहिन्यापूर्वी सिद्धार्थ शुक्लाचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. तो फक्त 40 वर्षांचा होता. सिद्धार्थच्या अचानक जाण्याच्या दुःखामुळे शहनाज महिनाभर घराबाहेरही पडली नाही. अलीकडेच शहनाजचा 'हौंसला रख' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. ज्यात तिच्यासोबत दिलजीत दोसांझ आणि सोनम बाजवा दिसले आहेत.