Sidharth Shukla च्या निधनानंतर सावरली Shehnaaz Gill? मेकर्सकडून मोठा खुलासा

शहनाज गिल आजही सिद्धार्थचं दुःख विसरली नाही 

Updated: Sep 23, 2021, 09:16 AM IST
Sidharth Shukla च्या निधनानंतर सावरली Shehnaaz Gill? मेकर्सकडून मोठा खुलासा

मुंबई : टीव्ही अभिनेता सिद्धार्थ शुक्ला (Sidharth Shukla)चे निधन होऊन 21 दिवस झाले आहे. 2 सप्टेंबर रोजी सिद्धार्थने जगाचा निरोप घेतला. अजूनही सिद्धार्थ शुक्लाच्या जाण्याने त्याचे कुटुंबिय आणि गर्लफ्रेंड शहनाज गिल सावरू शकलेली नाही. पण जवळची व्यक्ती दूर गेल्यावर प्रत्येकाला सावराव हे लागतंच. असंच काहीच शहनाज बरोबर झालं आहे. 

बिग बॉसनंतर शहनाज आणि सिद्धार्थ आपल्या कामात व्यस्त होते. सिद्धार्थचं अकाली निधन झालं. तरी शहनाजला आपल्या ठरलेल्या गोष्टी या पूर्ण कराव्याच लागतील. साइन केलेले तिने सिनेमे आता तिला पूर्ण करावे लागणार आहे. शहनाजने अपकमिंग सिनेमा 'हौसला रखा'चं डबिंग सुरू केलं आहे. याबाबत मेकर्सने मोठा खुलासा केला आहे. 

मेकर्सने सांगितलं शहनाज गिलच्या वापसीमागचं कारण 

सिद्धार्थ शुक्लाच्या दुःखावर मात करण्यासाठी शहनाज गिल स्वत: ला कामात व्यस्त करणार असल्याचं म्हटलं जात आहे. सिद्धार्थच्या मृत्यूने शहनाजला मोठा धक्का बसला आहे. मात्र ती लवकरच शहनाज कामावर परत येऊ शकते. लवकरच ती पंजाबी चित्रपट 'होनसला राख' चे शूटिंग सुरू करू शकते. बरं, चित्रपटाच्या निर्मात्यांना याबद्दल आणखी काही सांगायचं आहे. 'हौंंसला राख' चे निर्माते दिलजीत थिंड यांनी याबद्दल बोलले.

15 सप्टेंबरचं शूट झालं रद्द 

दिलजीत थिंड म्हणाले, 'आम्ही शहनाज गिलच्या बरे होण्याची वाट पाहत आहोत. आम्ही 15 सप्टेंबरला लंडनमध्ये गाण्याचे शूट करणार होतो, पण तसे झाले नाही. याचे कारण सर्वांसमोर आहे. त्याने असेही सांगितले आहे की लवकरच शहनाजसोबत नवीन तारखेला बोलू. शहनाज या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. तो शहनाजच्या पीएशी सतत संपर्कात असतो. शहनाज काही दिवसात संपर्क साधेल अशी अपेक्षा आहे.