'गोड गोजिरी लाज लाजरी ताई तू होणार नवरी!... शहनाज गिल लग्नासाठी सज्ज?

शहनाज गिलचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल...

Updated: Jun 20, 2022, 02:13 PM IST
'गोड गोजिरी लाज लाजरी ताई तू होणार नवरी!... शहनाज गिल लग्नासाठी सज्ज? title=

मुंबई : अभिनेत्री शहनाज गिलने रॅम्पवर डेब्यू केला आहे. शहनाजने तिच्या पहिल्याच रॅम्प वॉकपासून सोशल मीडियावर वर्चस्व गाजवलं आहे. लाल लेहेंग्यामधील वधूच्या रुपात शहनाजचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. ब्रायडल लूकमध्ये शहनाजने शोस्टॉपर बनून खूप प्रशंसा मिळवली.

लाल लेहेंगा, कपाळावर बिंदी,  नथ, झुमका, कुंदन हार, गजरा आणि बांगड्या घातलेल्या शहनाजने नववधूप्रमाणे वेशभूषा केली होती.  शहनाज गिलच्या वधूच्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आहेत. शहनाज आणि तिच्या चाहत्यांनी इंस्टाग्रामवर रॅम्प वॉकचे अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत.

तिच्या इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत शहनाजने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ''डेब्यू वॉक झाला! सुपर टॅलेंटेड डिझायनर सामंत चौहानसाठी मी रॅम्पवर उतरली. माझ्यासाठी हे आणखी खास बनवल्याबद्दल अहमदाबादच्या लोकांचे आभार!

शहनाजने फॅशन डिझायनर सामंत चौहानसाठी ब्राइडल लूकमध्ये रॅम्प वॉक केला. यासह शहनाजने शोस्टॉपर म्हणून रॅम्पवर धमाकेदार पदार्पण केलं आहे. शहनाज नव्या नवरीप्रमाणे सौंदर्य फ्लाँन्ट करताना दिसली.  जेव्हा शहनाज लाजत  स्टेजवर पोहोचली तेव्हा लोकांना तिच्या सौंदर्यासोबतच तिच्या स्टाइलचं जोरदार कौतूक केलं.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

चाहत्यांना शहनाजचा प्रत्येक लूक आवडत असला तरी तिला ब्राइडल लूकमध्ये पाहून सर्वांच्या नजरा तिच्यावर खिळल्या होत्या. शहनाजचा हा लूक पाहून लोकं तिची प्रशंसा करताना थकत नाहीत. शहनाजने ब्राइडल लूकने रॅम्पवर पदार्पण केलं आहे. यानंतर शहनाजही बॉलिवूड डेब्यूसाठी सज्ज झाली आहे. 'कभी ईद कभी दिवाळी' या चित्रपटातून ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.