शेहनाज करतेय लग्न? नक्की काय अभिनेत्रीच्या या रूपामागील सत्य?

शेहनाज करतेय लग्न? काय आहेत चाहत्यांच्या प्रतिक्रिया...

Updated: Oct 28, 2021, 11:26 AM IST
शेहनाज करतेय लग्न? नक्की काय अभिनेत्रीच्या या रूपामागील सत्य?

मुंबई : अभिनेता सिद्धार्थ शुक्लाने वयाच्या 40 व्य वर्षी जगाचा निरोप घेतला आहे. त्याच्या अचानक जाण्यामुळे फक्त चाहत्यांना नाही तर समस्त कलाविश्वाला मोठा धक्का बसला आहे. सिद्धार्थच्या निधनाला 2 महिने झाले आहेत. तरी देखील या  दुःखातून त्याचे चाहते अद्याप बाहेर आले नाही. सिद्धार्थच्या निधनानंतर चाहत्यांना अभिनेत्री आणि त्याची गर्लफ्रेन्ड शेहनाज गिलची चिंता सतावत होती. शेहनाज देखील या दुःखातून बाहेर येण्याचा प्रयत्न करत आहे. दरम्यान शेहनाजचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

व्हिडिओमध्ये शेहनाज नव्या नवरीच्या रूपात दिसत आहे. तिच्या चेहऱ्यावर आनंद उठून दिसत आहे. शेहनाजला असं पाहून सिद्धार्थचे चाहते देखील प्रचंड आनंदी झाले आहेत. व्हिडिओमध्ये शेहनाजने लाल रंगाचा लेहेंगा घातला आहे. सिद्धार्थच्या निधनानतंर लगेच शेहनाज लग्न करत आहे?  असं चाहत्यांना वाटत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

पण शेहनाज लग्न करत नसून सध्या व्हायरल होत असेलला व्हिडिओ फार जुना आहे. या व्हिडिओचं चित्रीकरण एका फोटोशूट दरम्यान केलं होतं. व्हिडिओमध्ये शेहनाज वेग-वेगळ्या पोज देताना दिसत आहे. शेहनाजचा हा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.