मुंबई : अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या निधनानंतर त्यांच्या चाहत्यांना आणि कलाविश्वाला मोठा धक्का बसला आहे. सिद्धार्थच्या अशा अचानक जाण्यामुळे कलाविश्वाचं मोठं नुकसान झालं आहे. सिद्धार्थाच्या जाण्यामुळे 'सिडनाज'चा या नात्याचा अंत झाला आहे. या मोठ्या संकटातून अभिनेत्री शेहनाज गिल स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत आहे. सिद्धार्थच्या निधनानंतर शेहनाज पुर्णपणे कोलमडली आहे. अशात कलाविश्व आणि चाहत्यांकडून सिद्धार्थच्या कुटुंबाचं आणि शेहनाजचं सांत्वन केलं जात आहे.
दरम्यान, शेहनाज आणि सिद्धार्थ यांचं नात बॉयफ्रेन्ड आणि गर्लफ्रेन्डचं नव्हतं तर त्यांचं नातं पती-पत्नीप्रमाणे होतं. असं वक्तव्य बिग बॉस 14 ची स्पर्धक अभिनेत्री पवित्रा पुनियाने केलं आहे. 'दोघांमध्ये अत्यंत चांगली बॉन्डिग होती. लोकांच्या मनात शेहनाज आणि सिद्धार्थचं प्रेम कायम राहील. आम्हाला सर्वांना दोघांची जोडी फार आवडते...'
पवित्रा पुढे म्हणाली, 'बिग बॉसच्या शोमध्ये खऱ्या पुनिताची मला ओळख करून देणारा फक्त सिद्धार्थ होता. सिद्धार्थमुळे मी काही काळ घरात राहू शकली नाहीतर मी पहिल्या आठवड्यातचं घरातून बाहेर झाली आसती.' सांगायचं झालं तर सिद्धार्थ आणि पवित्राच्या नात्याची देखील जोरदार चर्चा रंगली. पण यावर दोघांनीही कधीच खुसाला केला नाही.
वयाच्या 40 व्या वर्षी सिद्धार्थने घेतला अखेरचा श्वास
2 सप्टेंबर 2021 मध्ये सिद्धार्थ शुक्लाने अखेरचा श्वास घेतला. या संकटातून अद्यापही सिद्धार्थचे चाहते आणि त्याचे कुटुंबिय सावरले नाही. सध्या सोशल मीडियावर सिद्धार्थचे जुने व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत आहेत.