दिल्लीतील प्रदूषणयुक्त धुक्यांनी या अभिनेत्याच्या आईचा मृत्यू

दिल्ली सध्या प्रदूषित धुक्यांनी धुमाकुळ घातलाय. सर्वत्र फक्त प्रदूषण असल्याने लोकांना श्वास घेणेही अवघड झाले आहे. प्रत्येक बाजूला प्रदूषण असल्याने लोकांना श्वाससंदर्भातील अनेक समस्यांना सामोरे जावं लागतं आहेत. दिल्लीच्या लोकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे.

Updated: Nov 11, 2017, 12:00 PM IST
दिल्लीतील प्रदूषणयुक्त धुक्यांनी या अभिनेत्याच्या आईचा मृत्यू title=

नवी दिल्ली : दिल्ली सध्या प्रदूषित धुक्यांनी धुमाकुळ घातलाय. सर्वत्र फक्त प्रदूषण असल्याने लोकांना श्वास घेणेही अवघड झाले आहे. प्रत्येक बाजूला प्रदूषण असल्याने लोकांना श्वाससंदर्भातील अनेक समस्यांना सामोरे जावं लागतं आहेत. दिल्लीच्या लोकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे.

दिल्लीच्या प्रदूषणाला दिल्लीकर वैतागले असतांनाच दिग्दर्शक शेखर कपूर यांनी एक धक्कादायक गोष्ट ट्विटवर शेअर केली आहे. बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेते शेखर कपूर यांनी म्हटलं आहे की, दिल्लीच्या प्रदूषणाच्या धुक्यांमुळे त्यांच्या आईचा मृत्यू झाला आहे.

शेखर यांनी ट्विट केले की, "दिल्लीच्या प्रदूषणामुळे माझ्या आईचा मृत्यू झाला आहे. अखेरच्या हिवाळ्यात आईला लंग इन्फेक्शन झाला होता. जो कधीही चांगला झाला नाही. यामुळे त्या डिप्रेशनमध्ये गेल्या. मी त्यांना लंडनमध्ये ठेवलं असतं पण त्यांना नेहमी माझ्या दिल्लीतील घरात राहायची इच्छा असायची. शेखर म्हणतात की दिल्लीतीय या धुक्यांमुळेच हे सर्व झालं आहे. 

वरुण धवन, परिणिती चोप्रा आणि अर्जुन कपूर हे सिनेकलाकार देखील दिल्लीतील या प्रदूषणाने हैराण झाले आहेत.