‘झिंग गेम ऑन’वर शिखर धवन आणि करण वाहीने जागविल्या बालपणीच्या काही आठवणी

‘झिंग गेम ऑन’ या कार्यक्रमाच्या व्यासपिठावर करण आणि शिखर एकत्र 

Updated: Jan 24, 2020, 12:46 PM IST
‘झिंग गेम ऑन’वर शिखर धवन आणि करण वाहीने जागविल्या बालपणीच्या काही आठवणी title=

मुंबई : ‘झिंग गेम ऑन’ या कार्यक्रमाच्या व्यासपिठावर करणला भेटण्यासाठी जेव्हा शिखर आला, तेव्हा त्याच्यासाठी तो एक भावनिक प्रसंग ठरला. करण वाही हा या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक आहे. या दोघांनी आपले बालपण एकत्र व्यतीत केले असल्यामुळे या दोघांमध्ये एक भावनिक नाते निर्माण झाले आहे. सध्या दिल्लीत ते एकमेकांचे शेजारी आहेत. आपण लहान होतो, तेव्हा आपण दोघांनी मिळून एखादी कोलाची जाहिरात एकत्रितपणे करावी, अशी करणची इच्छा होती.

या दोघांना एकत्र आणण्यास हा कार्यक्रम एक सुयोग्य व्यासपीठ होते. मोठे होत असताना करण आणि शिखर यांच्यात क्रिकेटप्रेम हा समान धागा होता आणि क्रिकेट खेळण्यासाठी ते दोघे इतरांच्या नकळत कसे जात, ते करणने सांगितले. या दोघांनी आपल्या विश्वातील काही गुपिते प्रेक्षकांपुढे उघड केली. त्यांचे जीवन हे विविध घटनांनी आणि विनोदी प्रसंगांनी भरलेले आहे. या दोघांसाठी या व्यासपिठावर एकत्र येणे हा एक भावपूर्ण प्रसंग बनला; कारण करण वाहीच्या पालकांपाठोपाठ शिखरचे वडीलही या मंचावर त्याला भेटण्यासाठी आले. तेव्हा शिखर भारावून गेला. यावेळी शिखरच्या वडिलांनी आणि करणच्या पालकांनी या दोघांचे काही अज्ञात किस्से प्रेक्षकांना कथन केले.

या कार्यक्रमात सहभागी होता आले, याबद्दल आपल्या भावना व्यक्त करताना शिखर म्हणाला, “माझ्या वडिलांबरोबर या मंचावर एकत्र येण्याच्या कल्पनेने मी भारावून गेलो होतो कारण त्यांच्यासोबत मला माझ्या काही बालपणीच्या आठवणी पुन्हा जाग्या करता आल्या. या अनपेक्षित घटनेबद्दल मी करण आणि झिंग गेम ऑन यांचे मनापासून आभार मानतो. माझ्या वडिलांबरोबर करणही मला भेटला, याचा मला किती आनंद होत आहे, ते मी सांगू शकत नाही. करण आणि माझी मैत्री अगदी लहानपणापासूनची आहे. आमचे कुटुंबीयही एकमेकांना चांगले ओळखतात. त्यामुळे करणच्या आई-वडिलांना या कार्यक्रमात भेटल्यावर मी खूपच भावनावश आणि आनंदीही झालो होतो. करणबरोबर हलक्याफुलक्या गप्पा मारताना मी माझ्या लहानपणीच्या काळात गेलो. तेव्हा आम्हाला खेळायला कधी मिळतं आहे, याची आम्ही वाट पाहात असू. या कार्यक्रमाने माझ्या आठवणींचा खजिना उघडला असून त्या सर्व आठवणी माझ्या दृष्टीने खास आहेत.”

शिखर धवनच्या ह्या खट्याळ स्वभावाला जाणून घेण्यासाठी शनिवार, २५ जानेवारी रोजी संध्याकाळी ७ वाजता पाहा ‘हलदीराम प्रेझेंट्स व को-पावर्ड बाय ‘फॉग’ आणि ‘यामाहा एफझेड-एसएफआय’ ‘झिंग गेम ऑन’ फक्त ‘झिंग’ आणि ‘झी-5’वर.