वय ४६ पण असे फोटो काढले की, चांगल्या-चांगल्याना फोटो पाहून चक्कर येईल

शिल्पा शेट्टीचे ड्रेस इतके एक्सपेरिमेंटल आहेत की, चाहते फिदा झाल्याशिवाय राहूच शकत नाहीत. 

Updated: Dec 6, 2021, 09:08 PM IST
वय ४६ पण असे फोटो काढले की, चांगल्या-चांगल्याना फोटो पाहून चक्कर येईल

मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी फिटनेसच्या बाबतीत त्याचबरोबर तिच्या सौंदर्याच्या बाबतीतही भल्या-भल्या अभिनेत्रींना  टक्कर देते यात काहीच शंका नाही. वयाच्या 46 व्या वर्षी शिल्पा इतकी फिट आहे. जी तरुणींसाठी प्रेरणास्थानापेक्षा कमी नाही. त्याचबरोबर, फॅशनच्या बाबतीत, अभिनेत्री एकापेक्षा एक डिझायनर ड्रेस परिधान करते. शिल्पाच्या कपड्यांमधील खास गोष्ट म्हणजे ती बहुतेक इंडो वेस्टर्न कपडे कॅरी करते. प्रसिद्धी मिळवण्यातही शिल्पा कधीच मागे राहत नाही.

तिचे ड्रेस इतके एक्सपेरिमेंटल आहेत की, चाहते फिदा झाल्याशिवाय राहूच शकत नाहीत. यामुळेच अभिनेत्रीच्या वॉर्डरोबमध्ये फंकी स्टाइल कपड्यांपासून ते एथनिक कपड्यांपर्यंत डिझायनर कपड्यांचा भरणा आहे. ज्याची झलक सणासुदीच्या काळात खूप पाहायला मिळते.

मात्र, नुकताच शिल्पाचा असा लूक समोर आला होता, जो पाहून सगळेच आश्चर्यचकित होतायेत. डीप नेकलाइन कपड्यांमधली सुंदर शिल्पा सर्वांनाच आश्चर्यचकित करत आहे, शिल्पा शेट्टीचा हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

शिल्पा शेट्टीने अलीकडेच एका कार्यक्रमासाठी हा चमकदार सोनेरी ड्रेस परिधान केला होता. ज्यामध्ये तिचा बोल्ड लूक पाहण्यासारखा होता. अभिनेत्रीने हा न्यूड शेड ड्रेस क्लोदिंग लेबल  Jean Pierre Khoury वरून घेतला आहे.  जो तुम्ही कोणत्याही कॉकटेल पार्टीसाठी कॅरी करू शकता आणि प्रसिद्धी मिळवू शकता. शिल्पाचा हा ड्रेस बॉडीकॉन पॅटर्नचा आहे.