मुंबई : मासिक पाळी दरम्यान अनेक महिलांना वेदना होतात. दर महिन्याला महिलांना होणाऱ्या वेदना आता कमी होतील. कारण अभिनेत्री शिल्पा शेट्टीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामाध्यमातून महिलांना मासिक पाळी दरम्यान होणाऱ्या वेदना काही प्रमाणात कमी होण्यास मदत होईल. काही महिला वेदना थांबवण्यासाठी औषध घेतात. पण डॉक्टरांचा सल्ला न घेता औषध घेतलं तर त्याचा वाईट परिणाम आरोग्यावर होवू शकतो.
शिल्पाने व्हिडीओ शेअर करत काही सोपे योगासन दाखवले आहेत. शिवाय तिने कॅप्शनच्या माध्यमातून सर्व महिलांना महत्त्वाचा सल्ला दिला आहे. 'महिलांना मासिक त्रास अनेक वर्ष सहन करावा लागतो. ही साधी गोष्ट नाही. जर तुमच्या अनेक जबाबदाऱ्या असतील, तर फारचं कठीण...'
शिल्पा पुढे म्हणते, 'रोज स्वतःसाठी वेळ काढून योग केल्यानंतर वेदना कमी होतील... यामुळे मासिक पाळी नियमित येईल आणि वेदना देखील होणार नाहीत...'
सध्या शिल्पाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. शिल्पा कायम सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट चाहत्यांना फिटनेस टिप्स देत असते.