पती तुरुंगात गेल्याने देश सोडणार होती शिल्पा शेट्टी...; राज कुंद्रानेच केला मोठा खुलासा

Shilpa Shetty was planning to left country : पतीमुळे देश सोडून जाणार होती शिल्पा शेट्टी; राज कुंद्रानंच केला खुलासा

Updated: Oct 25, 2023, 02:45 PM IST
पती तुरुंगात गेल्याने देश सोडणार होती शिल्पा शेट्टी...; राज कुंद्रानेच केला मोठा खुलासा title=
(Photo Credit : Social Media)

Shilpa Shetty was planning to left country : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. 3 नोव्हेंबर रोजी त्याचा 69 यूटी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पॉनोग्राफी प्रकरणात मुंबईतील आर्थर रोड तुरुंगात त्यानं दोन महिने काढले आहेत. तर त्याच्या तुरुंगातील दिवसांवर हा चित्रपट आहे. त्याचा हा प्रवास कसा होता हे त्यात पाहायला मिळणार आहे. सध्या राज हा त्याच्या या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या दरम्यान, राज कुंद्रानं खुलासा केला की पत्नी शिल्पानं त्याला खूप पाठिंबा दिला. याशिवाय एक वेळ अशी ही आली होती जेव्हा तिला सगळं संपवायचं होतंस असा खुलासा त्यानं केला आहे. 

यूटी 69 या चित्रपटात राज कुंद्राचा तुरुंगात कसा काळ होता ते दाखवणार आहेत. 'इंडियन एक्सप्रेस'ला दिलेल्या मुलाखतीत राज कुंद्रानं त्याचा तुरुंगात किती वाईट काळ होता याविषयी सांगितले. 'आम्हाला आठवड्यातून फक्त एकदा फोन करण्याची परवाणगी होती. ते देखील काही मिनिटांसाठी. तेव्हा मी आणि शिल्पा एकमेकांना चिट्ठी लिहायचो. मी त्यात वाचायचो की काय होतयं. शिल्पा मला चांगलंच ओळखते आणि तिला माझ्या व्यावसायाविषयी सांगितले की त्यात काय काय करू शकतो आणि काय नाही. मला तिनं खूप पाठिंबा दिला', असं राज कुंद्रा म्हणाला.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

राजला तुरुंगातच सगळं संपवायचं होतं

राज पुढे याविषयी म्हणाला की 'शिल्पा मला म्हणायची की जेव्हा मला पहिल्यांदा कॉल आला आणि तिनं मला सांगितलं की राज हा क्षण एकदिवस निघून जाईल. आपण सगळे निर्णय विचारपूर्वक घ्यावे लागतील. तू माझ्यावर विश्वास ठेवं. तेव्हा माझ्या जिवात जीव आला आणि पुन्हा एकदा जगण्याची इच्छा माझ्या मनात आली. मी खरंच आतुन हरलो होतो, हे सगळं इतकं झालं होतं की तुरुंगात मी सगळं संपवलं असतं. मी त्या शब्दाचा वापर करायचा नाही, पण मी... तिथे खूप अपमान झाला, माझ्या प्रतिष्ठेला धक्का बसला. माझ्यामुळे मीडिया माझी पत्नी, मुलं आणि आई-वडिलांच्या मागे होते. ते खूप भयानक होतं. मला माहित होतं की बाहेर काय सुरु आहे. पण तुम्ही काय करु शकता? तुम्हाला स्वत: ला आठवण करून द्यावी लागले की हा फक्त एक वाईट काळ होता. मला सत्य काय आहे हे माहित आहे आणि हे एक दिवस समोर येईल.'

 हेही वाचा : डेव्हिड वॉर्नरनं बनवून घेतलं आधारकार्ड? फोटो होतोय व्हायरल; तुम्ही पाहिलात का?

शिल्पानं घेतला होता देश सोडण्याचा निर्णय

राज पुढे शिल्पाच्या देश सोडण्याच्या निर्णयावर बोलला आहे. राज म्हणाला, 'माझी पत्नी ही पहिली व्यक्ती होती, जिनं मला विचारलं की तुझी इच्छा आहे की आपण परदेशात सेटल होऊया. लंडनमध्ये सगळं सोडून, जिथे तुझा जन्म झाला, जिथे लहाणाचा मोठा झालास, ते सगळं सोडून तू इथे आलास. कारण मला इथे रहायचं होतं. पण आता तुला हवं असेल तर आपण लंडनला शिफ्ट होऊ शकतो. चल तिथे जाऊया. मी सगळं मॅनेज करेन. तेव्हा मी सांगितलं होतं की मला भारत आवडतो, माझं भारतावर प्रेम आहे आणि मी देश सोडणार नाही. लोक मोठे-मोठे घोटाळे करून हजारो कोटी कमवून देश सोडून निघून गेले, पण मी काही केलेलं नाही, तर मी देश सोडून का जाऊ.'