"तिने मला रात्री 11 वाजता बंगल्यावर बोलावलं अन्...", शिव ठाकरेने चित्रपटसृष्टीचं धक्कादायक सत्य आणलं समोर

Shiv Thakare on Casting Couch: झगमगच्या मनोरंजन क्षेत्रात अनेक अभिनेता, अभिनेत्रींना कास्टिंग काऊचचा काळा चेहरा पाहावा लागतो. शिव ठाकरे (Shiv Thakare) यालाही मनोरंजन क्षेत्रात अशा अनुभवांना सामोरं जावं लागलं आहे. नुकतंच एका मुलाखतीत त्याने काही धक्कादायक अनुभव सांगितले.   

Updated: Mar 30, 2023, 08:58 PM IST
"तिने मला रात्री 11 वाजता बंगल्यावर बोलावलं अन्...", शिव ठाकरेने चित्रपटसृष्टीचं धक्कादायक सत्य आणलं समोर

Shiv Thakare on Casting Couch: हिंदी 'बिग बॉस'मुळे शिव ठाकरे हे नाव आता घराघऱात पोहोचलं आहे. एमटीव्ही रोडीज आणि त्यानंतर मराठी बिग बॉसमुळे शिव ठाकरेला (Shiv Thakare) चांगलीच प्रसिद्धी मिळाली होती. अमरावतीच्या सामान्य मराठी कुटुंबातील शिव ठाकरे आज सेलिब्रिटी झाला असून हिंदी बिग बॉसमुळे त्याच्या प्रसिद्धीत चांगलीच वाढ झाली आहे. दरम्यान नुकतंच त्याने 'हिंदुस्तान टाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीत प्रसिद्धी मिळाल्यानंतर मनोरंजन क्षेत्रात आलेले काही धक्कादायक अनुभव सांगितले आहेत. 

शिव ठाकरेने हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत मनोरंजन क्षेत्रात कशाप्रकारे कास्टिंग काऊचच्या नावे तुम्हाला कशाप्रकारे जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला जातो हे सांगितलं आहे. शिव ठाकरे कधी कोणाच्या जाळ्यात अडकला नाही, मात्र काही वेळा तो अत्यंत जवळ पोहोचला होता. 

यामधील एक अनुभव आठवताना त्याने सांगितलं की "मी एकदा आराम नगरमध्ये ऑडिशनला गेलो होतो. त्याने मला बाथरुममध्ये नेलं आणि सांगितलं की, इथे मसाज सेंटर आहे. आता ऑडिशन आणि मसाज सेंटरमध्ये काय संबंध आहे हे मला समजलं नाही. त्याने मला सांगितलं की, ऑडिशन झाल्यावर एकदा इथे या, तुम्ही वर्कआऊटही करता ना....त्याने हे म्हटल्यावर मी तिथून निघालो. तो व्यक्ती कास्टिंग डायरेक्टर असल्याने मला कोणताही पंगा घ्यायचा नव्हता". 

"आता मी काही सलमान नाही. पण जेव्हा कास्टिंग काऊचचा विषय येतो तेव्हा महिला आणि पुरुष असा कोणताही भेदभाव केला जात नाही," असंही शिव ठाकरेने म्हटलं आहे.

दरम्यान शिव ठाकरेला आलेला हा एकमेव अनुभव नव्हता. दुसरा अनुभव सांगताना त्याने म्हटलं की "चार बंगला येथे एक महिला राहतो. त्या मला मी याला बनवलं आहे, त्याला बनवलं आहे अशा सांगत होत्या. त्या मला रात्री 11 वाजता ऑडिशनसाठी बोलवत होत्या. आता मी काय इतका भोळा तर नाही. त्यामुळे मी त्यांना कामात असून, येणं शक्य नाही असं कळवलं. त्यावर त्यांनी तुला काम करायचं नाही आहे का? तुला इंडस्ट्रीत काम मिळणार नाही अशा अनेक गोष्टी म्हटल्या. हे असे लोक तुमचं मनोबल कमी करण्याचा आणि मन वळवण्याचा प्रयत्न करत असतात. पण मी अशा गोष्टींना घाबरत नाही".

दरम्यान शिव ठाकरेने यावेळी काही लोकांनी आपली आर्थिक फसवणूक केल्याचा प्रयत्न केल्याचाही दावा केला. चांगली भूमिका देण्याच्या नावे लोक फसणूक कऱण्याचा प्रयत्न करत होते. पण जर आपण भूमिकेसाठी योग्य असू, तर मग कोणीही त्यावर काही करु शकत नाही यावर आपण विश्वास ठेवला असं शिव ठाकरे सांगतो. 

शिव ठाकरेच्या आधीही अनेक अभिनेत्यांनी कास्टिंग काऊचबद्दल आपले अनुभव शेअर केले आहेत. अभिनेता तसंच राजकीय नेते रवी किशन यांनीही काही दिवसांपूर्वी कशाप्रकारे आपल्याला इंडस्ट्रीत कास्टिंग काऊचचा अनुभव आला हे सांगितलं होतं. आज ती महिला एक मोठी सेलिब्रिटी आहे असंही त्यांनी सांगितलं होतं.