मुंबई: झाशीची राणी होण्यासाठी स्वत:च्या कर्मभूमीवर खरी निष्ठा आणि श्रद्धा असावी लागते. केवळ खोट्या घोड्यावर बसून किंवा दुसऱ्यांनी पढवलेले स्क्रिप्ट वाचून झाशीची राणी होता येत नाही, अशा शब्दांत शिवसेना नेते आदेश बांदेकर यांनी कंगना राणौतला फटकारले. मुंबईला पाकव्याप्त काश्मीरची उपमा दिल्यामुळे सध्या कंगना राणौत वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. शिवसेना पक्ष कंगनाविरोधात प्रचंड आक्रमक झाला आहे. तर दुसऱ्या बाजूला कंगनाही ट्विटवरून शिवसेनेला तोडीस तोड प्रत्युत्तर देत आहे.
'मुस्लिमांचे वर्चस्व असणाऱ्या बॉलीवूडमध्ये मी मराठ्यांचा इतिहास दाखवणारा चित्रपट बनवला'
या पार्श्वभूमीवर आदेश बांदेकर यांनी ट्विट करून कंगना आणि भाजपचा समाचार घेतला. त्यांनी म्हटले की, खोट्या घोड्यावर बसत , दुसऱ्यांनी पढवलेले स्क्रिप्ट वाचल्याने कधी कोणी झाशीची राणी होत नाही. त्यासाठी कर्मभूमीवर खरी निष्ठा आणि श्रद्धा असावी लागते. जी झाशीच्या राणीनी अखेरपर्यंत जोपासली. कुणालाही राणीची उपमा देऊन झाशीच्या राणीचा अपमान करण्यात काही 'राम' नाही, असे आदेश बांदेकर यांनी म्हटले.
खोट्या घोड्यावर बसत , दुसऱ्यानी पढवलेले स्क्रिप्ट वाचल्याने कधी कोणी झाशीची राणी होत नाही.. त्यासाठी कर्मभूमीवर खरी निष्ठा आणि श्रद्धा असावी लागते जी झाशीच्या राणीनी अखेरपर्यंत जोपासली...कुणालाही राणी ची उपमा देऊन झाशीच्या राणीचा अपमान करण्यात काही राम नाही .
— Adesh Bandekar - आदेश बांदेकर (@aadeshbandekar) September 4, 2020
कंगना म्हणजे झाशीची राणी; शिवसेना नेत्यांच्या पोकळ धमक्यांना घाबरणार नाही- राम कदम
तत्पूर्वी शुक्रवारी शिवसेना भवनासमोर कंगना महिला शिवसैनिकांनी कंगना राणौतचा पुतळा जाळून तिचा निषेध केला. तसेच येत्या ९ तारखेला कंगनाला शिवसेना स्टाईल इंगा दाखवण्याचा चंग शिवसैनिकांनी बांधला आहे. त्यामुळे आता ९ तारखेला काय घडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.