रियलिटी शोमध्ये असं काय घडलं की, अभिषेक बच्चनला आपली खूर्ची सोडून पळावं लागलं, पाहा व्हिडीओ

हा व्हिडीओ पाहून नक्की असं काय घडलं असावं की, अभिषेकला खूर्चीवरुन पळून जाण्याची वेळ आली असेल? असा प्रश्न लोकांना पडला आहे.

Updated: Mar 30, 2022, 08:23 PM IST
रियलिटी शोमध्ये असं काय घडलं की, अभिषेक बच्चनला आपली खूर्ची सोडून पळावं लागलं, पाहा व्हिडीओ title=

मुंबई : आपल्या भारतात टॅलेंटेड लोकांची कोणतीही कमी नाही. देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात जा, तुम्हाला तेथे काही अशा गोष्टी पाहायला मिळतील, ज्या तुम्ही कधीही पाहिल्या नसतील. अशाच लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी वेगवेगळे रिएलिटी शो येत असतात. जे लोकांना आपलं टॅलेंट दाखवण्याची संधी देतात. सध्या इंडियाज गॉट टॅलेंट हा रियलिटी शो टीव्हीवर सुरु आहे. ज्याच्यासंदर्भात एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्याने सर्वांचच लक्ष वेधून घेतलं आहे. या व्हिडीओमध्ये स्टंट करताना एक तरुण असा काही उंच उडाला आणि त्यानंतर जे काही घडलं ते पाहून अभिषेक बच्चन आपल्या सीटवरुन पळाला.

हा व्हिडीओ पाहून नक्की असं काय घडलं असावं की, अभिषेकला खूर्चीवरुन पळून जाण्याची वेळ आली असेल? असा प्रश्न लोकांना पडला आहे.

खरंतर या  रिएलिटी शोमध्ये अभिषेक बच्चन, न‍िम्रत कौर आणि यामी गौतम आपला आगामी सिनेमा 'दसवी'च्या प्रमोशनसाठी आले होते. त्यावेळेला एक ग्रुपने डान्स आणि स्टंट परफॉर्म केला होता. जो पाहून सगळ्यांच्याच हृदयाचे ठोके वाढले.

हा स्टंट करताना हे तरुण असे काही उड्यामारत होते की, त्यांना आपल्या जिवाची पर्वाच नाही आणि हे दृश्य सर्वांसाठीच खूप भितीदायक होते, ज्यामुळे यांच्य परफॉर्मंस सुरू होताच यामी आणि नम्रत ओरडू लागले. एवढेच काय तर या शोचे जजेस देखील किंचाळू लागले.

या ग्रुपचा परफॉर्मंस पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाला आव्हान देणारे आहे. त्यामुळे हा स्टंट पाहून अभिषेक देखील हादरला. त्या स्पर्धकांपैकी एकाला हवेत उडत आपल्या दिशेने येताना पाहून अभिषेक बच्चन आपल्या सोफ्यावरुन उठला आणि तेथून पळून जाऊ लागला.

या ग्रुपने फारच चांगला स्टंट परफॉर्म केला. त्यांच्या या स्टंटचं जजेस आणि अभिषेक बच्चनने देखील कौतुक केलं आहे.