पतीसोबत घटस्फोट घेऊन सई ताम्हणकर पुन्हा प्रेमात

2018 हे वर्ष सईसाठी वेगळं ठरलं आहे. 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Jan 8, 2018, 10:06 PM IST
पतीसोबत घटस्फोट घेऊन सई ताम्हणकर पुन्हा प्रेमात  title=

मुंबई : 2018 हे वर्ष सईसाठी वेगळं ठरलं आहे. 

सईने नुकताच आपला एक हॉट, बोल्ड आणि फिट असलेला एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो फोटोग्राफर तेजस नेरूळकरने शूट केला आहे. हा फोटो पोस्ट करताच याची बरीच चर्चा रंगली. पण याबरोबर एक सत्य देखील समोर आलं आहे. सई ताम्हणकरने आपल्या नवऱ्याशी दीड वर्षापूर्वी घटस्फोट घेतला असून ती आता पुन्हा एकदा प्रेमात पडली आहे.

का घेतला घटस्फोट? 

सईच्या या फोटोवरून चर्चा रंगलेली असल्यामुळे अनेक प्रसारमाध्यमं तिच्याशी या फोटोबाबत गप्पा मारत आहेत. टाईम्स ऑफ इंडिया या वर्तमानपत्राला तिने नुकतीच एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत तिने खूप साऱ्या गोष्टींवर मनसोक्त गप्पा मारल्या आहेत. या मुलाखतीत तिने ती पुन्हा प्रेमात पडली असल्याचे देखील सांगितले आहे. या तिच्या मुलाखतीची चांगलीच चर्चा होत आहे. या तिच्या मुलाखतीमुळेच तिचा घटस्फोट झाला असल्याचे तिच्या फॅन्सना कळले आहे. 

सई ताम्हणकर आणि अमेय गोसावी यांचे लग्न १५ डिसेंबर २०१३ ला झाले होते. अमेय हा देखील चित्रपटसृष्टीशी संबंधित आहे. तो एक प्रोड्युसर असून त्याची लोडिंग पिक्चर्स नावाची कंपनी आहे. सई आणि अमेय हे दोघे एकाच क्षेत्रातील असले तरी या दोघांनी कधी एकत्र काम केले नाही. सई आणि अमेय यांनी प्रेमविवाह केला होता. तीन वर्षांच्या नात्यानंतर त्यांनी लग्न केले होते. सई आणि तिच्या पतीमध्ये सगळे काही सुरळीत सुरू आहे असाच तिच्या फॅन्सचा समज होता. पण सई आणि तिच्या पत्नीचा दीड वर्षांपूर्वीच घटस्फोट झालेला आहे. 

अमेय आणि सईचे खूपच चांगले पटत होते. त्यांनी अनेकवेळा प्रसारमाध्यमांना एकत्र मुलाखतीदेखील दिल्या आहेत. तिने या मुलाखतींच्या दरम्यान अमेय तिला तिच्या प्रोफेशनमध्ये प्रचंड सर्पोट करत असल्याचे सांगितले होते. तिच्या लग्नानंतरच तिने 'हंटर' या सिनेमांत काम केलं होतं. आणि या सिनेमातील तिचा बोल्ड लूक भरपूर चर्चेत आला होतात.