Animal चित्रपटात दाखवलेलं घर कुणाचं माहितीये का?

रणबीर कपूर आणि रश्मिका मंदाना स्टारर एनिमल या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर अनेक  रेकॉर्ड मोडले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून ज्या सिनेमाची सर्वात जास्त चर्चा आहे ती म्हणजे रणबीरच्या एनिमल सिनेमाची. तगडी स्टार कास्ट आणि जबरदस्त दिग्दर्शनामुळे हा सिनेमा आधीपासूनच खूप चर्चेत आहे. 

Updated: Dec 5, 2023, 06:15 PM IST
Animal चित्रपटात दाखवलेलं घर कुणाचं माहितीये का? title=

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून ज्या सिनेमाची सर्वात जास्त चर्चा आहे ती म्हणजे रणबीरच्या एनिमल सिनेमाची. तगडी स्टार कास्ट आणि जबरदस्त दिग्दर्शनामुळे हा सिनेमा आधीपासूनच खूप चर्चेत आहे. आता या सिनेमाचा सगळीकडे बोलबाला आहे.  या सिनेमातील प्रत्येक सीन तुमचा श्वास रोखून धरायला भाग पाडेल. संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित एनिमल हा सिनेमा १ डिसेंबरला चित्रपटगृहात रिलीज झाला आहे.  हिंदीसोबतच हा चित्रपट तामिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्येही प्रदर्शित होणार आहे. या सिनेमातील मुख्य आकर्षण म्हणजे सिनेमातील भली मोठी स्टार कास्ट या चित्रपटात रणबीर कपूरसोबत बॉबी देओल, अनिल कपूर आणि रश्मिका मंदान्ना हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. 

रणबीर कपूर आणि रश्मिका मंदाना स्टारर एनिमल या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर अनेक  रेकॉर्ड मोडले आहेत. अॅक्शन क्राईम चित्रपट 'अ‍ॅनिमल' बॉक्स ऑफिसवर सध्या चांगली कमाई करत आहे. आता सिनेमा बाबतीत एक खास गोष्ट समोर आली आहे. खरतंर एनिमल सिनेमात रणबीर कपूरचं जे अलिशान घर दिसलं आहे ते सैफ अली खानचं पटौदी पॅलेस आहे. याचीच काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या सिनेमातं शूटिंग पटौदी पॅलेसच्या आतमध्ये शूच केलं गेलं आहे. सिनेमात हे घर सिंह परिवारचं मुख्य घरच्या रुपात दाखवण्यात आलं आहे आहे.

सैफ अली खानचा पटौदी पॅलेस १० एकरमध्ये बांधण्यात आला आहे. त्याचा हा पॅलेस गुडगांवमध्ये आहे. या पॅलेसमध्ये जवळ जवळ १५० खोल्या आहेत. याची किंमत 800 करोड रुपये इतकी आहे.एनिमल आधी ईथे मंगल पांडे, वीर-जारा, गांधी: माई फादर आमि मेरे ब्रदर की दुल्हन सिनेमाचं शूटिंग झालं आहे.

करिनाने सेलिब्रेट केला होता इथे वाढदिवस
यावर्षी करिना कपूर खानने आपला वाढदिवस पती सैफ अली खानसोबत पटौदी पॅलेसमध्ये साजरा केला होता. तिची बहिण करिश्मा कपूरने बर्थडेचे खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. याआधी 2020 मध्ये अभिनेत्री सोहा अली खानने या पॅलेसची ड्रोन फोटो शेअर केले होते. 

अॅनिमलने 4 दिवसांत कमावले 425 करोड रुपये.
या चित्रपटाने पहिल्या सोमवारी देशभरात 44 कोटींची कमाई केली. यामध्ये हिंदीने ४० कोटी आणि दक्षिणेतील ४ कोटींचा समावेश आहे. यासह भारतीय बॉक्स ऑफिसवर चित्रपटाचे कलेक्शन 246 कोटी 23 लाखांवर पोहोचलं आहे.रणबीर कपूरचा सिनेमा अॅनिमल शुक्रवारी रिलीज झाला आहे. या सिनेमाने चार दिवसांत ग्लोबली 425 करो रुपयांचं कलेक्शन केलं आहे.