Shraddha Kapoor : बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री श्रद्धा कपूरचा ‘स्त्री 2’ चा हा चित्रपट आजही चर्चेत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून मिळालेल्या प्रतिसादानंतर श्रद्धा या ना त्या कारणामुळे चर्चेत राहते. आता श्रद्धा चर्चेत येण्याचं कारण तिचं रिलेशनशिप आहे. श्रद्धानं तिचं रिलेशनशिप स्टेटस कन्फर्म केल्यानंतर एकच चर्चा रंगली आहे. श्रद्धा कपूर तिचं खासगी आयुष्य हे लाइमलाइट पासून दूर ठेवते. तिनं एका मुलाखतीत तिच्या पार्टनरचा उल्लेख करत चाहत्यांना काही गोष्टींविषयी विचार करण्यास भाग पाडले आहे.
श्रद्धा कपूरनं ही मुलाखत ‘कोस्मोपॉलिटन’ ला दिली आहे. या मुलाखतीत रिलेशनशिपमध्ये असल्याचं श्रद्धानं मान्य केलं. तिनं म्हटलं की मला माझ्या पार्टनरसोबत वेळ व्यथित करणं खूप आवडतं आणि त्याच्यासोबत चित्रपट पाहणं आवडतं, डिनरवर जाते आणि फिरत असते. मी अशी व्यक्त जिला असंच बसून राहायला आवडत नाही. खरंतर कथितपणे श्रद्धा कपूर ही राहुल मोदीला डेट करत होती. पण नुकत्याच आलेल्या माहितीनंतर त्या दोघांचं ब्रेकअप झाल्याचं म्हटलं जाऊ लागलं. या सगळ्या अफवा तेव्हा वाढल्या जेव्हा श्रद्धा कपूरनं राहुलसोबत त्याची बहीण आणि प्रोडक्शन हाउसला अनफॉलो केलं.
श्रद्धा कपूरची चुलत बहीण जनाई भोसलेनं देखील राहुलला अनफॉलो केलं आहे. ज्यामुळे वाटू लागलं आहे की त्यांचा खरंच ब्रेकअप झाला. फक्त श्रद्धा नाही तर राहुलनं यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही, पण ते त्यांच्या रुमर्ड रिलेशनशिपला घेऊन काही काळ चर्चेत होते. या वर्षाच्या सुरुवातीला दोघांनी डेटिंगच्या अफवा सुरु झाल्या होत्या. ते दोघं अंबानींच्या प्री-वेडिंग फंक्शनमध्ये एकत्र दिसले होते. तर श्रद्धा कपूरनं जून महिन्यात इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर करत तिच्या रिलेशनशिपला कन्फर्म केलं. श्रद्धआनं त्यावेळी कॅप्शनमध्ये लिहिलं होतं की ‘दिल रख ले, नींद तो वापिस दे दे यार.’ त्यावेळी तिनं राहुल मोदीला टॅगही केलं होतं.
'हिंदुस्तान टाइम्स'ला सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या दोघांना एकत्र फोटो काढायला आवडत नाही किंवा ते घाबरतात, याचा अर्थ हा नाही की ते सध्या त्यांच्या रिलेशनशिप स्टेटसला कन्फर्म करतील. दोघं त्यांच्या नात्याला लाइमलाटपासून दूर ठेवायचं आहे.
|
NAM
(20 ov) 156/8
|
VS |
NED
159/3(18 ov)
|
| Netherlands beat Namibia by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
SA
(20 ov) 213/4
|
VS |
CAN
156/8(20 ov)
|
| South Africa beat Canada by 57 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
OMA
(19.5 ov) 103
|
VS |
ZIM
106/2(13.3 ov)
|
| Zimbabwe beat Oman by 8 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.