'स्त्री 2' ची अभिनेत्री श्रद्धा कपूरचं नशिब फळफळलं, पंतप्रधान मोदींनाही टाकलं मागे

स्त्री 2 हा सिनेमा हिट झाल्यानंतर श्रद्धा कपूरची लोकप्रियता वाढली आहे. या सिनेमानंतर श्रद्धा कपूरने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील मागे टाकलं आहे. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Aug 22, 2024, 08:18 PM IST
'स्त्री 2' ची अभिनेत्री श्रद्धा कपूरचं नशिब फळफळलं, पंतप्रधान मोदींनाही टाकलं मागे  title=

'स्त्री 2' चित्रपटानंतर श्रद्धा कपूरची लोकप्रियता शिगेला पोहोचली आहे. या चित्रपटातील श्रद्धा कपूरचा अभिनय आणि चित्रपटाची कथा प्रेक्षकांना इतकी आवडली आहे की या अभिनेत्रीने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही मागे टाकले आहे. श्रद्धा कपूरने नेमकं असं काय केलं की, तिने चक्क भारताच्या पंतप्रधानांशीच टक्कर घेतली आहे. 

श्रद्धाने पीएम मोदींना मागे टाकले

'स्त्री 2' रिलीज झाल्यानंतर, श्रद्धा कपूर आता इंस्टाग्रामवर फॉलोअर्सच्या बाबतीत टॉप 3 च्या यादीत सामील झाली आहे. पहिल्या क्रमांकावर विराट कोहली, दुसऱ्या क्रमांकावर प्रियांका चोप्रा आणि तिसऱ्या क्रमांकावर श्रद्धा कपूर आहे. या अभिनेत्रीचे इंस्टाग्रामवर 91.4 मिलियन फॉलोअर्स आहेत तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे इंस्टाग्रामवर 91.3 मिलियन फॉलोअर्स आहेत. हा डेटा 21 ऑगस्ट 2024 पर्यंतचा आहे.

इतर कलाकारांचे फॉलोअर्स

इतर बॉलीवूड स्टार्सच्या फॉलोअर्सबद्दल बोलायचे तर विराट कोहली 271 मिलियन फॉलोअर्ससह पहिल्या क्रमांकावर आहे. प्रियांका चोप्राचे 91.8 मिलियन फॉलोअर्स आहेत. आलिया भट्टचे 85.1 मिलियन फॉलोअर्स आहेत आणि दीपिका पदुकोणचे 79.8 मिलियन फॉलोअर्स आहेत. शाहरुख खान अजूनही खूप मागे आहे. किंग खानचे सध्या 47.3M फॉलोअर्स आहेत.

स्त्री 2 ची वाढली लोकप्रियता 

श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांचा 'स्त्री 2' 15 ऑगस्टला रिलीज झाला. या हॉरर कॉमेडी चित्रपटाने रिलीज होताच बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून दिली. या चित्रपटाने 250 कोटींचा आकडा पार केला आहे. इतका की हा चित्रपट या वर्षातील सर्वात मोठा ओपनर ठरला आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर जवळपास 54 कोटींची कमाई केली होती. सरकटे यांची दहशत या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करत आहे. राजकुमार आणि श्रद्धा व्यतिरिक्त या चित्रपटात पंकज त्रिपाठी, अभिषेक बॅनर्जी आणि अपारशक्ती खुराना यांच्या भूमिका आहेत.