'हात लावू नको' महिलेने टच करताच भडकल्या हेमा मालिनी! सोशल मीडियावर ट्रोल

Hema Malini Viral Video With Fan : हेमा मालिनी यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Aug 22, 2024, 06:33 PM IST
'हात लावू नको' महिलेने टच करताच भडकल्या हेमा मालिनी! सोशल मीडियावर ट्रोल title=
(Photo Credit : Social Media)

Hema Malini Viral Video With Fan : बॉलिवूड अभिनेत्री आणि भारतीय जनता पार्टीच्या खासदार यांनी काल बुधवारी एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. या कार्यक्रमात अनूप जलोटा सारख्या अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमातील अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यातील एर व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ हेमा मालिनी यांचा आहे. या व्हिडीत पाहिल्यानंतर हेमा मालिनी या ट्रोलिंगचा शिकार झाल्या आहेत. नक्की काय झालं चला जाणून घेऊया...

हेमा मालिनी यांचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीनं शेअर केला आहे. या पोस्टमध्ये हेमा मालिनी आणि अनूप जलोटा फोटोसाठी पोज देताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये हेमा मालिनीसोबत एक महिला चाहती पाहायला मिळते. फोटो क्लिक करण्यासाठी ती चाहती हेमा मालिनी यांच्या खांद्यावर हाथ ठेवतानं दिसते. अशात हेमा मालिनी या थोड्या चिडतात आणि त्या चाहतीला हाथ काढण्यास सांगतात. व्हिडीओत पाहायला मिळते की एक व्यक्ती येतो आणि तो त्या चाहतीला हेमा मालिनी यांच्यापासून थोड लांब घेऊन जातो. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

खरंतर सोशल मीडियावर हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडीओत हेमा मालिनी यांनी त्यांच्या चाहतीला जशी वागणूक दिली त्यावर अनेकांनी त्यांना ट्रोल केलं आहे. या व्हिडीओ खाली कमेंट करत हेमा मालिनी यांना अनेकांनी ट्रोल केलं आहे. एका नेटकऱ्यानं म्हटलं की निवडणूकीच्या वेळी त्यांच्याच घरी जाऊन भीक का मागतात. दुसरा नेटकरी म्हणतात, चाहत्यांची ही चूक आहे की ते अशा घमंडी सेलिब्रिटींसोबत फोटो काढण्याचा प्रयत्न करतात. तिसऱ्या नेटकऱ्यानं कमेंट केली की निवडणूकीच्या वेळी जनतेनं हे सगळं लक्षात ठेवायला हवं. 

हेही वाचा : 'अंदाज अपना अपना'चा सिक्वेल येणार? 30 वर्षानंतर आमिर-सलमान एकत्र, प्रोडक्शन हाऊसने दिले संकेत

दरम्यान, काही दिवसांआधी हेमा मालिनी या त्यांच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आहेत. हेमा मालिनी यांनी विनेश फोगाटच्या पॅरिस ओलम्पिकमधून बाहेर पडण्यावर टीका केली होती. त्यांनी केलेल्या या टीकेवर अनेकांना ट्रोल केलं होतं.