Stree 2 : श्रद्धा कपूरचा 'स्त्री 2' पहिल्याच दिवशी 'गदर 2' चे रेकॉर्ड मोडणार?

श्रद्धा कपूरचा 'स्त्री 2' पहिल्याच दिवशी 'गदर 2' चित्रपटाचा विक्रम मोडण्याच्या तयारीत आहे. 15 ऑगस्टच्या दिवशी  'स्त्री 2' चित्रपटाला बंपर ओपनिंग मिळाली आहे. 

सोनेश्वर पाटील | Updated: Aug 15, 2024, 08:22 PM IST
Stree 2 : श्रद्धा कपूरचा 'स्त्री 2' पहिल्याच दिवशी 'गदर 2' चे रेकॉर्ड मोडणार?  title=

Stree 2 : अभिनेत्री श्रद्धा कपूरचा 'स्त्री 2' चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात श्रद्धा मुख्य भूमिकेत आहे. 'स्त्री 2' चित्रपटाबद्दल लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता बघायला मिळत आहे. अ‍ॅडव्हान्स बुकिंगमधून चित्रपटाने चांगली कमाई केली आहे. 2018 मध्ये 'स्त्री' प्रदर्शित झाला होता. तो प्रेक्षकांना खूप आवडला होता.

'स्त्री 2' चित्रपटाने 15 ऑगस्टच्या सुट्टीचा फायदा घेत बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांचा चित्रपट देशभरात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. 15 ऑगस्टच्या सुट्टीचा आणि या आठवड्यातील सुट्टीचा फायदा  'स्त्री 2' या चित्रपटाला होणार आहे. त्यामुळे पहिल्याच दिवशी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कलेक्शनमध्ये धमाकेदार कमाई करेल अशी अपेक्षा आहे. 

'स्त्री 2' चित्रपटाची जोरदार चर्चा

15 ऑगस्टच्या दिवशी अक्षय कुमारचा 'खेल खेल में' आणि जॉन अब्राहमचा 'वेदा'सोबत 'स्त्री 2' चित्रपट देखील प्रदर्शित झाला आहे. पण सध्या या सर्व चित्रपटांमध्ये सर्वात जास्त चर्चा ही अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि राजकुमार रावच्या 'स्त्री 2' या चित्रपटाची होत आहे. या चित्रपटाने अॅडव्हान्स बुकिंगमध्ये देखील मोठ्या प्रमाणात कमाई केली आहे. हा चित्रपट 'गदर 2' चा विक्रम मोडण्याची शक्यता आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 'स्त्री 2' पहिल्याच दिवशी 'गदर 2' चा रेकॉर्ड मोडणार? 

15 ऑगस्टच्या सुट्टीचा फायदा हा 'स्त्री 2' चित्रपटाला झाला आहे. त्यामुळे 'स्त्री 2' हा चित्रपट पहिल्याच दिवशी 40 कोटींहून अधिक कमाई करेल असा अंदाज सध्या व्यक्त केला जात आहे. 'स्त्री 2' हा चित्रपट 2024 मधील  हिंदी चित्रपटांमध्ये सर्वात मोठा ओपनिंग करणारा चित्रपट ठरणार आहे. यापूर्वी देखील असाच एक चित्रपट प्रदर्शित झाला होता. तो म्हणजे 'फायटर'. या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 23 कोटींची कमाई केली होती. तर 'गदर 2' या चित्रपटाने पहिल्या दिवशी 40.10 कोटी रुपयांची कमाई केली होती. त्याचबरोबर महेश बाबू यांच्या 'गुंटूर करम' या चित्रपटाने भारतात 41.3 कोटी रुपयांची कमाई केली होती.