'कंगनाला अल्लू अर्जुनच्या पुष्पा 3 मध्ये कास्ट करायला हवं कारण...', श्रेयस तळपद असं का म्हणाला?

Kangana Ranut In Pushpa 3 : श्रेयस तळपदेनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत कंगनाला 'पुष्पा 3' मध्ये कास्ट करायला हवं असं म्हटलं आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Aug 15, 2024, 07:55 PM IST
'कंगनाला अल्लू अर्जुनच्या पुष्पा 3 मध्ये कास्ट करायला हवं कारण...', श्रेयस तळपद असं का म्हणाला?  title=
(Photo Credit : Social Media)

Kangana Ranut In Pushpa 3 : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतनं बुधवारी 14 ऑगस्ट रोजी तिचा आगामी चित्रपट 'एमरजेंसी'चा ट्रेलर लॉन्च केला. कंगनाच्या एमरजेंसीवर बनवलेल्या या चित्रपटाला प्रेक्षक पसंती देत आहेत आणि आता प्रेक्षक यासगळ्याची प्रतीक्षा करत आहेत. कंगनानं मुंबईत चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च केला. यावेळी कंगनासोबत चित्रपटाची संपूर्ण कास्ट उपस्थित होती. यावेळी अभिनेता श्रेयस तळपदेला कंगनासोबत काम करण्याच्या अनुभवाविषयी प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाचं उत्तर देत श्रेयसनं सांगितलं की जर पुढे 'पुष्पा 3' बनवला तर तिला कास्ट करायला हवं. 

कंगनासोबत काम करण्याच्या अनुभवाविषयी बोलताना या कार्यक्रमात श्रेयसनं तळपदेनं सांगितलं की जेव्हा कंगनानं त्याला या चित्रपटासाठी विचारलं तेव्हा तो गोंधळला होता की त्यानं कंगनाला होकार द्यायला हवा की नाही. श्रेयस म्हणाला, जेव्हा कंगनानं मला अटल जींच्या भूमिकेसाठी विचारलं, तेव्हा मला कळत नव्हतं की मी कसं रिअॅक्ट करायला हवं. मी गोंधळलो आणि घाबरलो होतो, माझं असं झालं होतं की मला काय करायला सांगितलं आहे? मी हे करायला हवं की सोडायला हवं? आणि हे त्यामुळे नव्हतं की इंडस्ट्रीनं तिचा बहिष्कार केला म्हणून, त्याचं कारण मी गोंधळलो होतो हेच होतं. पुढे श्रेयसनं सांगितलं की कंगना नसती तर त्याला अटल बिहारी वाजपेयी यांची भूमिका साकारणं कठीण झालं असतं. 

कंगनासोबत काम करण्याचा अनुभवांविषयी सांगताना श्रेयस म्हणाला की एकदा मी माझ्या सीनची रिहर्सल करत होतो. ती रिहर्सल खूप चांगली झाली होती. पण टेकच्यावेळी, मी माझ्याकडून काही एक्स्ट्रा करण्याचा प्रयत्न केला. मग कंगना आली आणि माझ्या कानात म्हणाली तू जे काही रिहर्सलमध्ये केलंस कृपया तेच आता इथे कर. 

पुढे श्रेयस तळपदेनं सांगितलं की 'ज्या प्रकारे कंगना सेटवर मल्टीटास्क करते. जर पुढे जाऊन ते पुष्पा 3 बनवणार असतील तर निर्मात्यांना विनंती करेन की त्यांनी कंगना रणौतला घ्यायला हवं, कारण 'झुकेगा नहीं साला.' 

हेही वाचा : कीमोथेरेपी सुरु असताना परत आले केस! कॅन्सरग्रस्त हिना खानचा आनंद गगनात मावेना, म्हणाली...

एमरजेंसीविषयी बोलायचं झालं तर राजकारणावर हा चित्रपट आधारीत आहे. कंगना या चित्रपटात दिवंगत पंतप्रधान इंदिरा गाधी यांची भूमिका साकारली होती. कंगनानं तिच्या निवडणूकीला पाहता चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारिख पुढे ढकलली होती. हा चित्रपट आता 6 डिसेंबर 2024 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. कंगनाच्या या चित्रपटात अनुपम खेर, महिमा चौधरी, मिलिंद सोमन, श्रेयस तळपदे, विशाक नायर आणि दिवंगत अभिनेता सतीश कौशिक यांच्यासारखे कलाकार आहेत.