'त्या' ट्विटनंतर श्रेयसने केआरकेला चांगलचं झापलं

नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या केआरके म्हणजेच कमाल खान याला मऱ्हाटमोळ्या श्रेयस तळपदेने जबरदस्त हिसका दाखवला आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Sep 9, 2017, 04:35 PM IST
'त्या' ट्विटनंतर श्रेयसने केआरकेला चांगलचं झापलं

मुंबई : नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या केआरके म्हणजेच कमाल खान याला मऱ्हाटमोळ्या श्रेयस तळपदेने जबरदस्त हिसका दाखवला आहे.

बॉक्स ऑफीसवर 'पोस्टर बॉईज' आणि 'डॅडी' या सिनेमांची टक्कर होत आहे. श्रेयस दळपदे याचा 'पोस्टर बॉईज' हा सिनेमा चांगली कमाईही करत आहे. मात्र, श्रेयस तळपदेच्या 'पोस्टर बॉईज' या सिनेमावर केआरकेने वाईट भाषेत टीका केली. मात्र, केआरकेच्या या टीकेवर श्रेयस तळपदे यानेही प्रत्युत्तर दिलं आहे.

झालं असं की, केआरकेने श्रेयस तळपदेच्या 'पोस्टर बॉईज' या सिनेमावर प्रतिक्रिया देताना आक्षेपार्ह शब्द वापरला. तसेच, 'पोस्टर बॉईज' हा एक नंबरचा वाह्यात सिनेमा आहे. या सिनेमाने पहिल्या दिवशी केवळ १ कोटी ८० लाखांचा गल्ला जमवला. हा देवोल बंधूंच्या XXX दिग्दर्शनाचा पुरावा आहे.

केआरके याने केलेल्या या ट्विटनंतर अभिनेता श्रेयस तळपदे चांगलाच भडकला आणि त्यानेही ट्विटरवर प्रत्युत्तर दिलं आहे. श्रेयसने ट्विट करत म्हटलं की, "औकात में रह कमाल खान chu**#. कभी हाथ लगा तो इतनी जोर से पटकूंगा की टप्पा खा के छत से लगेगा. जय महाराष्ट्र"

अभिनेता श्रेयसच्या चाहत्यांनीही केआरकेला ट्विटरवर सुनावण्यास सुरुवात केली आहे. आता केआरके यावर काय प्रतिक्रिया देतो हे पहावं लागेल.