मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचं दुबईत कार्डिअॅक अरेस्टने निधन झालं. सोमवारी सकाळी त्यांच्यावर मुंबईत अंत्यसंस्कार होणार आहेत.
आज रात्री ८ वाजेपर्यंत पार्थिव मुंबईत आणले जाणार आहे. तिच्या अनेक आठवणी उजागर केल्या जात आहेत. तिचे किस्से, सिनेमा, हिट गाणी या सर्वांतून श्रीदेवी पुन्हा पुन्हा आठवतेय. दरम्यान बदललेल्या बॉलिवूड इंडस्ट्रीबद्दलचे त्यांचे वक्तव्यही समोर आले आहे.
दुबईत मृत्यू
सूत्रांच्या माहितीनुसार, शनिवार रात्री ११ वाजता श्रीदेवी हॉटेलच्या बाथरूममध्ये पडल्या.
त्यानंतर त्यांना तात्काळ राशिद रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केलं. दुबईतील प्रसिद्ध जुमेराह इमीरात हॉटेलमध्ये त्या थांबल्या होत्या.
अचानक एक्झिट
श्रीदेवी या आपल्या कुटुंबियांसोबत एका विवाह सोहळ्यासाठी दुबईला गेल्या होत्या. श्रीदेवींच्या निधनाने संपूर्ण बॉलिवूडवर विश्वावर शोककळा पसरली आहे. अनेकांना या बातमीने धक्का बसला आहे.
झाडामागे कपडे बदलायचो
गेल्या काही वर्षात फिल्म इंडस्ट्रीत झालेले बदल श्रीदेवीच्या पसंतीस पडल्याचे दिसले. बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत ती याबद्दल बोलत होती.
आजच्या अभिनेत्रींसाठी वॅनिटी व्हॅन हे वरदान आहे. आमच्यावेळी ही सुविधा नव्हती. झाडांच्यामागे आम्हाला कपडे बदलावे लागत असे तिने मुलाखतीत सांगितले होते.
शौचालय नसायचे
जवळ शौचालय नसल्याने शूटींगदरम्यान दिवसभर पाणी प्यायचे नाही असा धक्कादायक खुलासाही तिने यावेळी केला.
रीळ संपण्याची भिती
तसेच कोणत्या सीनचे १० रिटेक झाले तर रीळ संपल्याच्या भितीचा दबाव आमच्यावर असायचा असेही तिने मुलाखतीत सांगितले.