श्रीदेवींच्या निधनावर संजय कपूर यांचा खुलासा

दुबईमध्ये एका लग्न सोहळ्यासाठी गेलेल्या अभिनेत्री श्रीदेवी यांचं कार्डिअॅक अरेस्टने निधन झालं. 

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Feb 25, 2018, 07:28 PM IST
श्रीदेवींच्या निधनावर संजय कपूर यांचा खुलासा

मुंबई : दुबईमध्ये एका लग्न सोहळ्यासाठी गेलेल्या अभिनेत्री श्रीदेवी यांचं कार्डिअॅक अरेस्टने निधन झालं. 

संजय कपूर यांचा खुलासा

श्रीदेवी यांचा दिर संजय कपूर यांनी म्हटलं की, श्रीदेवींच्या अचानक निधनाने संपूर्ण कुटुंबियांना धक्का बसलाय. श्रीदेवींना हृद्य विकार नसल्याचं देखील संजय कपूर यांनी म्हटलं आहे.

अचानक एक्झिट

बॉलिवूडची चांदनी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्रीदेवी यांचं शनिवारी रात्री 11 वाजता निधन झालं. संजय कपूर यांनी या नंतर हा खूलासा केला आहे. दुबईतील एका हॉटेलमध्ये त्या थांबल्या होत्या.

कुटुंबियांसोबत होत्या दुबईला

संजय कपूर यांनी म्हटलं की, आम्ही सगळे हैराण आहोत. कारण त्यांना हृद्यविकाराचा कोणताही त्रास नव्हता. संजय कपूर रविवारी सकाळीच दुबईला पोहोचले आहेत. श्रीदेवी या मोहित मारवाह याच्या लग्नासाठी दुबईला गेल्या होत्या. पती बोनी कपूर आणि छोटी मुलगी देखील त्यांच्यासोबत दुबईला गेली होती. तर दुसरी मुलगी जान्हवी तिच्या सिनेमाच्या शूटींगमध्ये व्यस्त होती.