Shridevi Pregnant Controversy : 13 व्या वर्षीच आई झाली होती श्रीदेवी; सुपरस्टार रजनीकांतसोबत आहे कनेक्शन

श्रीदेवी आणि बोनी कपूर यांचं सिनेमाच्या शूटिंगदरम्यानच सूत जुळले होते, सेटवर त्यांचा रोमान्स सर्वजण पाहत होते. रजनीकांत यांच्यासोबत लागोपाठ अनेक हिट सिनेमे त्यांनी दिले 

Updated: Feb 22, 2023, 03:33 PM IST
Shridevi Pregnant Controversy : 13 व्या वर्षीच आई झाली होती श्रीदेवी; सुपरस्टार रजनीकांतसोबत आहे कनेक्शन  title=

Shridevi Got Pregnant For Rajnikant: बॉलिवूडची दिवंगत आणि हरहुन्नरी अभिनेत्री, श्रीदेवी अश्या अभिनेत्रींपैकी एक आहे जिने स्वतःच्या अभिनयाने संपूर्ण जगाला वेड लावलं. कधी गंभीर तर कधी मजेशीर भूमिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करून एकदिवस अचानक श्रीदेवीने जगाच्या रंगभूमीतून कायमची एक्झिट घेतली. मात्र आजही श्रीदेवी यांच्या अनेक आठवणी प्रेक्षकांना लक्षात आहेत. अजरामर सिनेमांमधून त्या प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेतच. (shridevi got pregnant for rajnikant)

अगदी लहान वयापासून श्रीदेवी यांनी अभिनयाला सुरवात केली होती. भलेही आज श्रीदेवी आपल्यात नाहीत मात्र त्यांचे अनेक किस्से आजही चर्चेत असतात. श्रीदेवी यांना दोन मुली आहेत. ख़ुशी कपूर आणि जान्हवी कपूर. आज खुशी आणि जान्हवी बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयामुळे ओळखल्या जातात. जान्हवीने तर 'धडक' आणि 'मिली' सारख्या सिनेमांमधून आपल्या अभिनयाची झलक दाखवलीच आहे.. पण तुम्हाला ऐकून धक्का बसेल कि श्रीदेवी,  ख़ुशी आणि जान्हवीला जन्म द्यायच्या आधीच आई झाल्या होत्या.

वयाच्या तेराव्या वर्षी झाली श्रीदेवी प्रेग्नन्ट ?   

हो वयाच्या 13 व्या वर्षी श्रीदेवी यांना आई व्हावं लागलं होत. ऐकून तुम्हालाही धक्का बसला ना ? पण थांबा आम्ही सगळं सांगतोय ते अगदी खरं आहे,पण हे सगळं घडलंय ते म्हणजे रियल लाईफमध्ये नाही तर रील लाईफमध्ये.  

जेव्हा रजनीकांत  यांच्यामुळे श्रीदेवीला व्हावं लागलं होतं आई!

श्रीदेवी यांनी त्यांच्या करिअरची सुरवात साऊथ मध्ये म्हणजे दाक्षिणात्य सिनेमांमधून केली होती. त्या स्वतः दक्षिणेकडीलच होत्या. एक बालकलाकार म्हणून त्यांनी आपल्या फिल्मी करिअरची सुरवात केली होती. 
त्याच झालं असं , 'मंदरू मुदिचू'  सिनेमा त्यांना मिळाला ज्यात सावत्र आईची भूमिका त्यांना मिळाली होती. त्यावेळी त्या केवळ १३ वर्षांच्या होत्या. आणि या सिनेमात ज्या अभिनेत्याच्या सावत्र आईची भूमिका त्यांना साकारायची होती ते होते सुपरस्टार रजनीकांत. (superstar rajnikant and shridevi chemistry) त्यावेळी रजनीकांत हे श्रीदेवी यांच्यापेक्षा वयाने फारच मोठे होते. मात्र श्रीदेवी यांनी ही भूमिका अत्यंत चोखपणे निभावली होती. हा सिनेमा आणि त्यातली श्रीदेवी यांची भूमिका अगदी सुपरहिट ठरली  होती. 

रजनीकांत यांच्यासोबत जोडी ठरली सुपरहिट 

दोघांची जोडी त्यानंतर अनेक सिनेमांमध्ये आपण पहिली , प्रेक्षकांनासुद्धा ही जोडी फार आवडू लागली.  (shridevi,rajanikant movies)या जोडीने त्यांनतर जवळपास २० सिनेमांमध्ये एकत्र काम केलं आणि प्रेक्षकांचं मनोरंजन केलं.  

श्रीदेवी यांना आईच्या भूमिकेसाठी मिळाले होते रजनीकांत यांच्यापेक्षा जास्त मानधन 

या सुपरहिट सिनेमात श्रीदेवी यांना 5000 रुपये इतकं मानधन मिळालं होतं, तर रजनीकांत यांना त्यांच्याहीपेक्षा कमी म्हणजे केवळ 2000 रुपये इतकंच मानधन मिळालं होतं. (late actress shridevi got pregnant for rajnikant)