श्रीदेवीचे बर्थडे सेलिब्रेशन !

काही दिवसांपूर्वीच श्रीदेवीने ५४ वा वाढदिवस साजरा केला. ‘मिस हवाहवाई’ला शुभेच्छा देण्यासाठी बॉलिवूडमधील सर्व बडे सेलिब्रिटी उपस्थित होते. 

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Aug 18, 2017, 12:10 PM IST
श्रीदेवीचे बर्थडे सेलिब्रेशन ! title=

मुंबई : काही दिवसांपूर्वीच श्रीदेवीने ५४ वा वाढदिवस साजरा केला. ‘मिस हवाहवाई’ला शुभेच्छा देण्यासाठी बॉलिवूडमधील सर्व बडे सेलिब्रिटी उपस्थित होते. श्रीदेवीचा वाढदिवस १३ ऑगस्टला असून बर्थडेच्या निमित्त्याने तिला अनेकांनी सोशल मीडियावरून शुभेच्छा दिल्या.

त्याचबरोबर श्रीदेवीच्या बर्थडे बॅशमधील एक खास फोटो स्वतः मनिषने सोशल मीडियावर शेअर केला आहे. बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्री या फोटोत पाहायला मिळत आहेत. विद्या बालन, राणी मुखर्जी, ऐश्वर्या राय बच्चन, रेखा, शबाना आझमी आणि टीना अंबानी या अभिनेत्री बर्थडे पार्टीत सहभागी झाल्या होत्या. यावेळी साडीला प्राधान्य देणाऱ्या विद्या आणि रेखा पारंपरिक वेशात सुरेख दिसत होत्या. तर राणी आणि ऐश्वर्याचा ग्लॅमरस लूक पाहावयास मिळाला.

श्रीदेवी आणि मनिष मल्होत्रा यांच्या कुटुंबांमध्ये चांगली मैत्री असल्यामुळेच त्याने बर्थडे पार्टीचे आयोजन केले होते. पार्टीला निर्माता, दिग्दर्शक करण जोहर देखील उपस्थित होता. श्रीदेवीच्या कुटुंबाव्यतिरीक्त हुमा कुरेशी, नवाजुद्दीन सिद्दीकी, करण टॅकर, जावेद अख्तर, फराह खान, पुनित मल्होत्रा यांसह अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते.