'महाराष्ट्राची ही संस्कृती नाही, पण...', Sachin Pilgaonkar यांच्या मुलीचे हॉट फोटो पाहून संतापले चाहते

श्रिया पिळगावकरच्या हॉट फोटोंची सोशल मीडियावर चर्चा, काहींनी पसंती दर्शवली तर, काही चाहत्यांनी मात्र...  

Updated: Sep 7, 2022, 08:09 AM IST
'महाराष्ट्राची ही संस्कृती नाही, पण...', Sachin Pilgaonkar यांच्या मुलीचे हॉट फोटो पाहून संतापले चाहते title=

मुंबई : मराठमोळा अभिनेता सचिन पिळगावकर (Sachin Pilgaonkar) आणि सुप्रिया पिळगावकर (Supriya Pilgaonkar) यांची कन्या - अभिनेत्री श्रिया पिळगावकरनं (Shriya pilgaonkar) कमी वेळात आपली वेगळी ओळख निर्माण केलीय. 'मिर्झापूर' (Mirzapur) वेब सीरिजच्या माध्यमातून श्रियाला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली. 'एकुलती एक' या मराठी चित्रपटातून मनोरंजनसृष्टीत पदार्पण करणारी श्रिया सध्या तिच्या हॉट आणि बोल्ड फोटोंमुळे चर्चेत आली आहे. श्रियाचा हा बोल्डलूक अभिनेत्रीच्या काही चाहत्यांना आवडला, पण काहींनी मात्र श्रियाला ट्रोल केलं आहे. श्रियाने स्वतःचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. (Shriya pilgaonkar bold look)

फोटोमध्ये श्रियाने फ्लॉरल मोनोकिनी घातली असून त्यावर पांढरे स्पोर्ट शूज घातले आहेत. श्रियाने फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये 'Sporty Spice' असं लिहिलं आहे. श्रियाच्या फोटोवर अनेकांनी कमेंट देखील केल्या आहे. (Shriya pilgaonkar hot photo on social media)

कमेंटमध्ये काहींनी 'फार छान दिसत आहेस..', 'क्यूट..' अशी कमेंट केली आहे. तर काहींनी मात्र श्रियाच्या बोल्ड लूकला विरोध केला आहे. 'ह्यांच्याकडून महाराष्ट्राला ही अपेक्षा नाही आणि ही महाराष्ट्राची संस्कृती पण नाही...' असं म्हणत विरोध केला आहे. (comment on Shriya pilgaonkar new photo)

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

श्रियाने आतापर्यंत मराठीप्रमाणेच तिने हिंदी चित्रपट, वेब सीरिज, विदेशी भाषांमधील कलाकृती, नाटकं यामध्ये काम केलं आहे. शिवाय अभिनेत्रीने अनेक ब्रँड्सच्या जाहिरातीही केल्या आहेत. (Shriya pilgaonkar Films)

अभिनेत्री श्रिया पिळगांवकर हिने आतापर्यँत 'फॅन', 'हाऊस अरेस्ट', 'भांगरा पा ले' या सिनेमांमध्ये तसेच 'मिर्झापूर', 'द गॉन गेम', 'गिल्टी माइंड्स', 'द ब्रोकन न्यूज', 'क्रॅकडाऊन' या तिच्या काही गाजलेल्या वेब सीरिजमधून विविध भूमिका साकारल्या आहेत.