Sushmita Sen नक्की कोणासोबत रिलेशनशिपमध्ये?

Sushmita Sen आणि Lalit Modi यांच्या नात्यातील दुराव्यावर शिक्कामोर्तब, आणि दुसऱ्याच नात्याची चर्चा... काय चाललंय काय? 

Updated: Sep 7, 2022, 08:03 AM IST
Sushmita Sen नक्की कोणासोबत रिलेशनशिपमध्ये? title=
Bollywood Actress sushmita sen shares photo with ex boyfriend rohman shawl amid break rumors with lalit modi

Sushmita Sen Rohman Shawl : अभिनेत्री सुष्मिता सेन सध्या तिच्या कोणत्याही आगामी प्रोजेक्टपेक्षा जास्त चर्चेत आहे ते म्हणजे तिच्या खासगी आयुष्यामुळे. एक अभिनेत्री असण्यासोबतच सुष्मिता एक आई आणि खंबीर महिलाही आहे. तिच्या आयुष्यात प्रेमाच्या बाबतीत मात्र फारसं यश आलेलं दिसत नाही. सुष्मिता आतापर्यंत बऱ्याच रिलेशनशिपमध्ये होती. पण, कोणतंही नातं तिला आयुष्यभराची साथ देऊ शकलं नाही. काही दिवसांपूर्वी म्हणे सुष्मिता सेन आणि ललित मोदी रिलेशनशिपमध्ये असल्याचं पाहिलं गेलं. जिथं मोदी त्यांच्या नात्याची कबुली देत होते, तिथेच सुष्मितानं मात्र हे नातं जाहीरपणे स्वीकारलं नाही. आता तर, या नात्यात दुरावा आल्याची चर्चा आहेत. 

Sushmita च्या खासगी आयुष्यात इतरी सगळी नाती बदलत असताना गेल्या साधारण चार वर्षांपासून एका व्यक्तीची तिला मिळालेली साथ मात्र कायम आहे. ही साथ आहे, रोहमन शॉल (Rohman Shawl)ची. 

एक वेळ अशी होती जेव्हा रोहमन आणि सुष्मिता (Sushmita Sen Rohman Shawl) रिलेशनशिपमध्ये होते. पण, आता मात्र ही वेळ फार मागे पडली आहे. या जोडीचा ब्रेकअप झाल्याची बाब समोर आली आणि अनेकांना हादरा बसला. पण, मुद्दा असा की नात्याला पूर्णविराम देऊनही त्यांच्यात असणारी जवळीक मात्र कमी झाली नाही. 

रोहमननं हल्लीच सुष्मिताच्या लेकिच्या (Sushmita sen Daughter Birthday) वाढदिवसाच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या पार्टीला हजेरी लावली होती. याच पार्टीतील एक फोटो सोशल मीडियावर गाजतोय. कारण ठरतंय, त्यात दिसणारी त्या दोघांचीही केमिस्ट्री. 

रोहमनशी ब्रेकअप, ललिक मोदींसोबतच्या रिलेशनशिपच्या चर्चा आणि आता पुन्हा एकदा त्याच्याशीच जवळीक हे सर्व पाहता सुष्मिताचं प्रेम नक्की कोणावर आहे, असाच प्रश्न चाहते आणि तिच्या फॉलोअर्सना पडू लागला आहे. 

मुद्दा असा, की रोहमन आणि ललित मोदी या दोघांसोबतही रिलेशनशिपमध्ये नसल्याचं अप्रत्यक्षरित्या भासवणारी सुष्मिता आणखी कोणत्या सिक्रेट रिलेशनशिपमध्ये तर नाही, असा प्रश्नही काहींना पडू लागला आहे.