Box Office Collection : आयुष्मानच्या सिनेमाला प्रेक्षकांचा Zyada प्यार

तीन दिवसांत सिनेमाने कमावला एवढा गल्ला 

Updated: Feb 24, 2020, 03:31 PM IST
Box Office Collection : आयुष्मानच्या सिनेमाला प्रेक्षकांचा Zyada प्यार

मुंबई : Shubh Mangal Zyada Saavdhan Box Office Collection आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana)चा सिनेमा शुभ मंगल ज्यादा सावधान प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीला येत आहे. शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या सिनेमाने तीन दिवसांत चांगली कमाई केली आहे. 

बॉक्स ऑफिस डॉट कॉमे वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, महाशिवरात्रीला प्रदर्शित झालेल्या सिनेमाने दुसऱ्या दिवशी10.75 करोड रुपयांची कमाई केली आहे. तर दुरूवातीच्या आकड्यांनुसार असा अंदाज वर्तवला जात आहे की, सिनेमा शनिवार, रविवारी चांगलीच कमाई करेल. गेल्या तीन दिवसांत सिनेमाने 31 करोड रुपयांची कमाई केली आहे. 

'गे' लव्ह स्टोरीवर आधारित असलेल्या सिनेमाला प्रेक्षकांनी भरपूर पसंत केलं आहे. पुन्हा एकदा चाहत्यांच मन जिंकण्यात अभिनेता आयुष्मान खुराना यशस्वी ठरला आहे. सिनेमात आयुष्मान खुराना आणि जितेंद्र कुमार यांची लव्हस्टोरी दाखवण्यात आली आहे. 

आयुष्मान खुरानाने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये 'इंडियाने दिखाया अपना ज्यादा प्यार' अशी कॅप्शन टाकत आयुष्मानने पहिल्या दिवसाची कमाई 9.55 करोड रुपयाची कमाई शेअर केली आहे. सिनेमाने पहिल्याच दिवशी एवढी कमाई केल्यामुळे उत्सुकता शिगेला पोहोचली.