सारा आणि Shubman Gill मध्ये फुलतोय प्रेमाचा गुलाब? क्रिकेटपटूचं उत्तर जाणून तुम्हीही म्हणाल, 'किती गोड'

साराला डेट करतोय Shubman Gill? खुद्द क्रिकेटपटूने मौन सोडल्यानंतर सर्वत्र चर्चांना उधाण... पाहा काय म्हणाला शुभमन?   

Updated: Nov 16, 2022, 05:01 PM IST
सारा आणि Shubman Gill मध्ये फुलतोय प्रेमाचा गुलाब? क्रिकेटपटूचं उत्तर जाणून तुम्हीही म्हणाल, 'किती गोड' title=

Sara Ali Khan dating Shubman Gill : झगमगत्या विश्वात (Film Industry) कधी कोणाचं नाव कोणासोबत जोडलं जाईल सांगता येत नाही. आता पुन्हा क्रिकेट विश्वातील आघाडीचा खेळाडू आणि बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीमध्ये प्रेमाचा गुलाब फुलत असल्याची चर्चा रंगत आहे. क्रिकेटर शुभमन गिल (Shubhman Gill) आणि अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) रिलेशलशिपमध्ये असल्याच्या चर्चा रंगत आहे. महत्त्वाचं म्हणजे शुभमन गिलने त्यांच्या नात्याबद्दल मोठा खुलासा केला आहे. 

एका मुलाखतीत शुभमनला असे काही प्रश्न विचारण्यात आले, ज्यामुळे सारा आणि शुभमन रिलेशनशिरपमध्ये आहेत की नाही? हे सत्य समोर आलं आहे. मुलाखतीत शुभमनला 'तुझी आवडती अभिनेत्री कोण?' असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा क्षणाचाही विलंब न करता त्याने अभिनेत्री सारा अली खानचं नाव घेतलं. (shubman gill dating sara ali khan)

पुढे शुभमनला 'तू साराला डेट करत आहेस का?' असा प्रश्न विचारला. यावर क्रिकेटपटू म्हणाला, 'कदाचित....'.  त्यानंतर शुभमनला साराबद्दल सगळं खरं सांग असं सांगण्यात आलं तेव्हा शुभमन म्हणाला, 'सारा दा सारा सच बोल दिया... कदाचित हो... कदाचित नाही... ' (shubman gill sara ali khan)

शुभमनच्या दिलल्या उत्तरानंतर चाहते देखील गोंधळात पडले आहेत. पण त्याने दिलेलं उत्तर मात्र चाहत्यांना आवडलं आहे. त्यामुळे सारा आणि शुभमन त्यांच्या नात्याचा स्वीकार सर्वांसमोर करतात की नाही... हा येणारा काळच सांगेल... 

दरम्यान... सोशल मीडियावर एक फोटो तुफान व्हायरल (Viral Photo) झाला होता. फोटोमध्ये शुभमन आणि सारा एकत्र एका हॉटेलमध्ये बसलेले होते. तेव्हा अभिनेता सैफ अली खानची (Saif Ali Khan) मुलगी आणि अभिनेत्री सारा आली खान अ आणि शुभमन यांच्यात प्रेमाचा गुलाब बहरत असल्याची चर्चा रंगत आहे.